आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 गोष्टींवरून समजेल एखाद्याच्या मृत्यूनंतर गरुड पुरणाचा पाठ का करावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या व्यक्तीने जन्म घेतला त्याचा मृत्यू निश्चित आहे. जीवन जगताना तसेच मृत्युनंतर काही प्रथांचे पालन मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना करणे आवश्यक असते. याच प्रथांमधील एक प्रथा घरातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर गरुड पुराण वाचण्याची, ऐकण्याची आहे. एखाद्या ब्राह्मणाकडून गरुड पुरण वाचून घेतले जाते आणि कुटुंबातील सदस्य याचे श्रवण करतात. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार गरुड पुराणाशी संबंधित 10 खास गोष्टी...


1- मान्यतेनुसार गरुड पुराणाचे पाठ आणि श्रवण केल्यास मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते. गरुड पुरण बारा-तेरा दिवस वाचले जाते. 


2- शास्त्रानुसार मृत व्यक्तीचे सर्व विधी पूर्ण होईपर्यंत त्याचा आत्मा घरातच निवास करतो आणि तोही हे पुराण ऐकतो. गरुड पुराण ऐकण्याचे धार्मिक महत्त्व हेच आहे की, मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळावा.


3- सामान्यतः लोकांच्या मनामध्ये जन्म आणि मृत्यूशी संबंधित विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची उत्सुकता असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा कुटुंबातील इतर सदस्य हाच विचार करतात की, मृत्यू का येतो? गरुड पुराणामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्यात आली आहेत.


4- गरुड पुराणामध्ये भगवान विष्णूची भक्ती आणि उपासनेचे महत्त्व सांगण्यात आले आहे. यामध्ये श्रीहरींच्या 24 अवतारांच्या कथांचा उल्लेख आहे. त्यानंतर विविध पौराणिक कथा आहेत. 


5- सूर्य, चंद्र इ. ग्रहांचे मंत्र, शिव-पार्वती पूजेचे महत्त्व, इंद्र, सरस्वती आणि नऊ शक्तींची माहिती या पुराणात सांगण्यात आली आहे.


6- मूळ गरुड पुराण दोन भागांमध्ये आहे. पहिल्या भागात श्रीहरींच्या भक्ती आणि उपासनेचे महत्त्व सांगण्यात आले आहे. दुसर्‍या भागात जन्म-मृत्यूचे रहस्य सांगण्यात आले आहे.


7- गरुड पुराणात वेगवेगळ्या नरकांचा उल्लेख आहे. मृत्युनंतर आत्म्याचे काय होते, त्याचा कशाप्रकारे दुसर्‍या योनीत जन्म होतो, श्राद्ध आणि पितर कर्म या सर्व गोष्टींचे महत्त्व सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...