आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पेशल डेस्क - मध्य प्रदेशात एक आदिवासी भाग असा आहे जेथे एकही विधवा स्त्री नाही. येथे पुरुषांचा मृत्यू होत नाही, असे मुळीच नाही. परंतु त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या पत्नी विधवा राहत नाहीत. या परिसरातील परंपरेनुसार जर एखाद्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला, तर तिचे लग्न कुटुंबातील अविवाहित पुरुषाशी लावण्यात येते, मग तो महिलेचा नातू का असेना. हो हे खरं आहे. राज्यातील मंडला जिल्ह्यातील गोंड समाजात ही प्रथा प्रचलित आहे.
येथे एकही विधवा स्त्री नाही...
गोंड समाजात शोधूनही विधवा स्त्री सापडणार नाही. भारतात आजही पतीच्या मृत्यूनंतर जेथे अनेक भागांमध्ये विधवांना पुनर्विवाहाची अनुमती नाहीये, तेथेच गोंड समाजातील ही अनोखी प्रथा आदर्शवतच म्हणावी लागेल.
काय आहे देवर पाटो आणि नाती पाटो?
गोंड आदिवासींमध्ये तशा अनेक प्रथा प्रचलित आहेत. यापैकीच एक प्रथा आहे "देवर पाटो" आणि "नाती पाटो". पतीचा मृत्यू झाल्यानंतर घरात कोणताही अविवाहित पुरुष नसेल तर अशा परिस्थितीत महिलेला चांदीच्या बांगड्या दिल्या जातात. या बांगड्या तिला पतीच्या दहाव्याच्या दिवशीच दिल्या जातात. यानंतर त्या महिलेला विधवा न मानता सौभाग्यवती मानले जाते.
देवर पाटो म्हणजे महिलेच्या पतीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराच्या दहाव्या दिवशी समाजाच्या उपस्थितीत दीर आपल्या भावजयीला चांदीच्या बांगड्या घालतो, याला देवर पाटो म्हणतात. यानंतर ते पती-पत्नीप्रमाणे पुढील आयुष्य घालवू शकतात.
स्त्रियांचा सन्मान करणारी परंपरा
विशेष म्हणजे, वयातील अंतर पाहता साधारणपणे या नात्यात महिला आणि पुरुषात शारीरिक संबंध नसतात. परंतु जर दोघेही मर्जीने जवळ आले तर त्यांना कोणी रोखत नाही. गोंड समाजातील लोक गावाबाहेर असले तरीही या प्रथेचे पालन करतात. एवढेच नाही- सुशिक्षित तरुण-तरुणींमध्येही ही स्त्रियांचा सन्मान करणारी परंपरा आजही जिवंत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.