Home | Business | Business Special | unknown facts about india richest family daughter in law shloka mehta

रोझी ब्लू फाउंडेशनच्या संचालक आहेत श्लोका मेहता; जाणून घ्या भारतातील सर्वात श्रीमंत घराण्याच्या सुनेबद्दल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 09, 2019, 06:35 PM IST

एकाच शाळेत शिकले श्लोका-आकाश...

 • unknown facts about india richest family daughter in law shloka mehta

  बिझनेस डेस्क - मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोक मेहता विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा 11 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. श्लोका मेहताबद्दल सांगावयाचे झाल्यास त्या डायमंड किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रसेल मेहता यांच्या कन्या आहेत. श्लोका यांचे शिक्षण मुंबईत झाले आहे. युरोपात आणि अमेरिकेत त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे.


  रोझी ब्लू फाउंडेशनच्या संचालक आहेत श्लोका...
  > श्‍लोका मेहता यांनी आपले आयुष्य बिझनेसमध्ये नाही तर परोपकाराच्या क्षेत्रासाठी अर्पित केले आहे.
  > श्‍लोका रोझी ब्‍लू फाउंडेशनच्या संचालक आहेत. ही संस्था शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.
  > श्लोका एक ब्लॉगर देखील आहेत. त्यांना अभ्यासाव्यतिरिकत फिरण्याचीही खूप आवड आहे.
  > श्‍लोका यांना परोपकाराचे काम करण्याची प्रेरणा त्यांचे आजोबा अरुण कुमार मेहता यांच्याकडून मिळाली.
  > मेहता आणि अंबानी कुटुंबीय एकमेकांचे परीचित आहेत. श्लोका यांच्या मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी मुकेश अंबानी बहरीन येथेही गेले होते.
  > श्‍लोका यांच्या आई मोना मेहतासोबत नीरव मोदी यांचे कनेक्‍शन आहे. मोना मेहता यांच्या भावाचे म्हणजेच श्लोका यांचे मामा मयंक मेहता यांचे लग्न नीरव मोदी यांची बहिण पूर्वी हिच्यासोबत झाले आहे.
  > श्‍लोका यांनी प्रिन्सटन युनिव्हर्सिटीतून मानवशास्त्राचा अभ्यास केला आहे. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अॅण्ड पॉलिटिकल सायन्समधून विधी शास्त्रात स्नातकोत्तर डिग्री मिळवली आहे.
  > श्‍लोका यांच्या मते पैशापेक्षा मानवी साधनसंपत्तीची किंमत अधिक आहे. पैसे तुम्हाला नक्कीच मदत करतात पण ते माणसाची जागा घेऊ शकत नाही.

Trending