आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभकर्णाला पाहून ब्रह्मदेवांनी विचार केला की, जर याने दररोज जेवण केले तर संपूर्ण सृष्टी नष्ट होईल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 8 ऑक्टोबरला अश्विन मासातील दशमी तिथी म्हणजे दसरा आहे. या  दिवशी रावण, कुंभकर्ण आणि मेघनादचे पुतळे जाळण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. येथे जाणून घ्या, रावणाचा भाऊ कुंभकर्णशी संबंधित खास गोष्टी... रामायणानुसार विभीषण आणि कुंभकर्ण असे रावणाचे दोन भाऊ होते. ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी या तीन भावांनी कठोर तपस्या केली होती. तपस्येनंतर ब्रह्मदेवा प्रकट झाले. पण कुंभकर्णाला वरदान देण्यापूर्वी चिंतित होते. याबाबत श्रीरामचरित मानसमध्ये लिहिले आहे की-

पुनि प्रभु कुंभकरन पहिं गयऊ। तेहि बिलोकि मन बिसमय भयऊ।।

याचा अर्थ असा होतो, की रावणाला वरदान दिल्यानंतर ब्रह्मदेव कुंभकर्णाजवळ गेले. पण त्याला वरदान देण्यावरुन चिंतीत होते. त्याचा देह बघून आश्चर्यचकित झाले होते.


जौं एहिं खल नित करब अहारू। होइहि सब उजारि संसारू।।
सारद प्रेरि तासु मति फेरी। मागेसि नीद मास षट केर
ी।।

कुंभकर्णाला भोजनासाठी अनेक पदार्थ लागायचे. दररोज जर तो भरपेट खात राहिला तर सृष्टी नष्ट होऊ शकते, असे ब्रह्मदेवांना वाटले. ब्रह्मदेवांनी सरस्वती देवीशी संपर्क साधून त्याची बुद्धी भ्रमित केली. त्यामुळे त्याने सहा महिने झोपण्याचे वरदान मागितले. ब्रह्मदेवांनी लगेच तथास्तू म्हटले.


अतिबल कुंभकरन अस भ्राता। जेहि कहुँ नहिं प्रतिभट जग जाता।। 
करइ पान सोवइ षट मासा। जागत होइ तिहुँ पुर त्रा
सा।। 

रावणाचा भाऊ कुंभकर्ण अतिशय बलवान होता. त्याच्याशी लढू शकेल असा पुरुष कोणत्याही जगात नव्हता. मदिरा प्राशन करुन तो सहा महिने झोपायचा. तो जेव्हा उठायचा तिन्ही लोकांत हाहाकार माजवायचा. 

जौ दिन प्रति अहार कर सोई। बिस्व बेगि सब चौपट होई।।

कुंभकर्ण जर दररोज जेवला असता तर संपूर्ण सृष्टी नष्ट झाली असती. त्यामुळे ब्रह्माजींनी त्याची बुद्धी भ्रमित केली होती.

  • तेव्हा कुंभकर्णाला खुप दुःख झाले होते

कुंभकर्णाचा भाऊ रावणाने सितेचे अपहरण केले होते. तिला लंकेत बंदिस्त ठेवले होते. यामुळे रामाला वानरसेना घेऊन लंकेला यावे लागले होते. यावेळी कुंभकर्ण झोपलेला होता. रावणाचे अनेक सुरमा ठार झाल्यानंतर कुंभकर्णाला उठविण्यात आले. जेव्हा त्याला कळाले, की रावणाने सितेचे अपहरण केले त्याला खुप दुःख झाले. जगदंबा हरि आनि अब सठ चाहत कल्यान। तेव्हा कुंभकर्ण रावणाला म्हणाला, की अरे मुर्खा. तू जगत जननीचे हरण केले आहे. आता तुला कल्याण हवे आहे. तू श्रीरामाची माफी माग. सितेला परत कर. तेव्हाच रावण कुळ वाचू शकेल. त्यानंतरही रावण मानला नाही.

  • कुंभकर्णाला नारदाने दिले होते तत्वज्ञान

कुंभकर्णाला पाप-पुण्य आणि धर्म-कर्म याच्याशी काही देणेघेणे नव्हते. झोपेतून उठल्यावर त्याचा एक दिवस जेवण करण्यात आणि घडामोडी जाणून घेण्यात जायचा. रावणाच्या अधर्मी कृत्यात त्याचा सहभाग नसे. त्यामुळे स्वयं देवर्षि नारद यांनी कुंभकर्णाला तत्त्वज्ञानाचे धडे दिले होते. रावणाचा मान ठेवण्यासाठी झाला होता युद्ध करण्यास तयार श्रीराम साक्षात भगवान विष्णूचे अवतार आहेत. त्यांना युद्धात कुणीही हरवू शकत नाही, याची माहिती कुंभकर्णाला होती. पण रावण काही ऐकण्यास तयार नव्हता. त्यामुळे अनिच्छेनेच कुंभकर्ण युद्धाला तयार झाला. या जिवनातून मुक्ती मिळावी, यासाठी तो श्रीरामाशी लढला. यावेळी त्याच्या मनात रामाविषयी द्वेषभावना नव्हती.

बातम्या आणखी आहेत...