आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगा जन्म घेतलेल्या अपत्याला लगेच नदीमध्ये प्रवाहित करत होती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्यतः कुटुंबातील मोठेच मुलांसाठी त्याग करतात. परंतु यशस्वी जीवन तेच आहे ज्यामध्ये अपत्य आपल्या आई-वडिलांसाठी त्याग करण्यास शिकतील. असे लोक भाग्यशाली असतात ज्यांची मुले आई-वडिलांसाठी त्याग करतात. परंतु असे अपत्य मिळणेही अवघड आहे. जे लोक अपत्यासाठी त्याग करतात, अपत्याला संस्कार आणि योग्यता मिळवून देण्यासाठी त्यांचा मोह सोडतात अशा लोकांना मुलांचे हे सुख प्राप्त होऊ शकते.


शांतनु देवी गंगावर झाले होते मोहित
भीष्म पितामह यांच्या वडिलांचे नाव शांतनु होते. एकदा शांतनु शिकार करताना गंगातटावर पोहोचले. तेथे त्यांना एक परम सुंदर स्त्री दिसली. त्या स्त्रीला पाहून शांतनु तिच्यावर मोहित झाले. शांतनुने तिला लग्नाची मागणी घातली. त्या स्त्रीने लग्नाला होकार दिला आणि एक अटही घातली की, तुम्ही कधीही मला कोणतेही काम करण्यासाठी आडवणार नाहीत, असे केल्यास त्याचक्षणी मी तुम्हाला सोडून निघून जाईल. शांतनुने अट मान्य करून तिच्याशी लग्न केले.


त्यानंतर दोघांचे वैवाहिक आयुष्य सुखात व्यतीत होऊ लागले. शांतनुच्या घरात सात मुलांनी जन्म घेतला परंतु सर्व मुलांना पत्नीने गंगा नदीमध्ये टाकले. शांतनु हे सर्व पाहूनसुद्धा शांत होते कारण पत्नीला दिलेले वचन ते मोडू शकत नव्हते. आठवा मुलगा झाल्यानंतर त्यालाही पत्नी गंगेत टाकत असताना शांतनुने तिला अडवले आणि विचारले, तू असे का करत आहेस ?


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, त्यानंतर काय झाले...

बातम्या आणखी आहेत...