आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तानाजी'मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका वठवणारा हा मराठमोळा अभिनेता करायचा जिममध्ये नोकरी, 'बाहुबली'चा होता आवाज 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क: दिग्दर्शक ओम राऊत 'तानाजी द अनसंग वॉरियर' या चित्रपटातून तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत. स्वराज्य स्थापनेपासून प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत तानाजीं मालुसरेंचा सहभाग होता. ते 4 फेब्रुवारी 1970 रोजी झालेल्या कोंढाण्याच्या लढाईसाठी ओळखले जातात. अभिनेता अजय देवगणने या चित्रपटात तानाजी मालुसरेंची भूमिका वठवली आहे. तर  छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता शरद केळकर आहे. 


अलीकडेच चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजवेळी मराठमोळ्या शरद केळकरच्या नावाची बरीच चर्चा झाली. शरद केळकर साकारत असलेल्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल एका पत्रकाराने त्याला प्रश्न विचारला.  प्रश्न विचारताना एकाने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. शरदने लगेचच शिवाजी नव्हे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे म्हणायला सांगितले. शरदच्या मनातील शिवाजी महाराजांचा आदर पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी त्याच्यावर टाळ्यांचा वर्षाव केला. 

या पॅकेजमधून जाणून घेऊयात मराठमोळ्या शरद केळकरविषयी.... 

  • मराठी कुटुंबात झाला जन्म...

7 ऑक्टोबर 1976 रोजी एका मराठी कुटुंबात शरदचा जन्म झाला. शरदच्या बालपणीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. आई आणि बहीण त्याची प्रेरणा असल्याचे तो सांगतो.

  • जिममध्ये करायचा नोकरी...

शरदचे सुरुवातीचे शिक्षण ग्वालियरमध्ये झाले. तर इंदूरच्या प्रेस्टीज कॉलेजमधून त्याने एमबीए पूर्ण केले. एमबीए पूर्ण झाल्यानंतर शरदने फिजिकल एज्युकेशनच्या जगात प्रवेश केला. करिअरच्या सुरुवातीच्या काळात शरदने जिम इन्स्ट्रक्टर म्हणून काम केले. 2002 साली शरद ग्रेसिम मिस्टर इंडियाचा फायनलिस्ट ठरला. पण तो हा किताब जिंकू शकला नाही. मुंबईत आल्यानंतर शरदने एका टेलिकॉम कंपनीत पार्ट टाइम जॉब सुरु केला. सोबतच एका जीममध्ये जिम इन्स्ट्रक्टर म्हणूनही काम केले. कामासोबतच तो मॉडेलिंगसुद्धा करु लागला होता. 

  • दुरदर्शनवरुन सुरु झाला प्रवास...

2004 मध्ये शरदने दुरदर्शनवर प्रसारित होणा-या 'आक्रोश' या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. 2009 मध्ये इमॅजिन टीव्हीवर प्रसारित झालेल्या 'पती, पत्नी और वो' या शोचे सूत्रसंचालनसुद्धा केले. शरदने बॉलिवूडमध्ये 'हलचल', 'गोलियों की रासलीला रामलीला', 'हीरो', 'मोहनजोदारो', 'रॉकी हँडसम', 'इरादा', 'भूमी' या सिनेमांमध्ये काम केलंय. याशिवाय शरदने काही दिवसांपूर्वी 'लौट आओ त्रिशा' या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. शरदने रितेश देशमुखच्या 'लय भारी'मध्ये संग्रामची भूमिका केली होती.  

  • 'बाहुबली'साठी केले होते वॉइस ओव्हर...

'बाहुबली’ चित्रपटातील बाहुबलीच्या भारदस्त आवाजामागे शरद केळकरचा आवाज आहे. शरदने हिंदी व्हर्जनसाठी डबिंग केलंय. प्रभासने साकारलेल्या बाहुबली या भूमिकेसाठी त्याने आवाज दिला आहे. मुळचा मध्यप्रदेशातील असलेल्या शरदच्या मते, तो मध्यप्रदेशातील असल्याने त्याची हिंदी भाषा चांगली आहे.

  • फक्त पाच दिवसांत पूर्ण केले होते 'बाहुबली'चे डबिंग...

हिंदी टीव्हीच्या दुनियेतील अभिनेता शरद केळकर हा त्याच्या दमदार आवाजासाठी ओळखला जातो. पण त्यांच्या जीवनातही यूटर्न तेव्हा आला जेव्हा राजामौली यांच्या बाहुबली  चित्रपटासाठी त्यांनी आवाजाची टेस्ट दिली. शरदने त्याच्या या अनुभवाबद्द्ल सांगितले, मी टेलिव्हिजनवर अनेक वर्षापासून काम करत आहे. खूप लोक म्हणायचे की, तुमचा आवाज खूप छान आहे. डबिंग का नाही करत ? त्यानंतर माझा डबिंगचा प्रवास सुरू झाला.

  • करण जोहरला बसला होता आश्चर्याचा धक्का...

मी प्रोफेशनल डबिंग नव्हतो करत पण सुरुवात झाली. या चित्रपटात मी आवाज दिला आहे हे सांगितल्यावर लोकांना विश्वास नाही बसत.  मी करण जोहर यांना अनेक दिवसांपासून ओळखतो. त्यांना ही जेव्हा माहित पडलं की मी या चित्रपटात आवाज दिला आहे तर त्यांना देखील विश्वास बसला नाही. डबिंग करतांना भाषेच्या अडचणी येतात. मी डबिंग कलाकार नाही आहे. मी एक अभिनेता आहे. पण संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतरच मी डबिंग करतो. शरदने फक्त 5 दिवसांत बाहुबलीचं डबिंग केलं आहे. पहिल्या सिरीजसाठी जास्त वेळ लागला होता पण दुसरी सिरीज पाच दिवसांत पूर्ण केली. 

  • हॉलिवूडसाठी केलंय डबिंग...

शरद केळकर हा हॉलिवूड चित्रपटांना हिंदीत डब करण्यासाठीही प्रसिद्ध आहे. शरदने आतापर्यंत गार्डियन्स ऑफ गॅलक्सी, एक्स मॅन सारख्या आणखीही गाजलेल्या चित्रपटांसाठी हिंदी डबिंग केलं आहे. 

  • टीव्ही अॅक्ट्रेससोबत केलंय लग्न...

शरदने 2005 मध्ये टीव्ही अभिनेत्री किर्ती गायकवाडसोबत लग्न केले. किर्तीने सात फेरे या मालिकेत चांदनी ही भूमिका वठवली होती. हे कपल 2006 मध्ये नच बलिये 2 या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाले होते.

  • एका मुलीचा बाबा आहे शरद...

शरद आणि किर्ती यांना एक मुलगी असून फेब्रुवारी 2014मध्ये तिचा जन्म झाला.  किर्ती (Keerti) आणि शरद (Sharad) यांच्या नावावरुन त्यांनी आपल्या मुलीचे नाव केशा (KeSha) असे ठेवले.   

बातम्या आणखी आहेत...