Home | Jeevan Mantra | Dharm | unknown facts about tirupati balaji

दिवसातून तीन वेळेस करू शकता भगवान बालाजी मूर्तीचे दर्शन, तिरुपतीशी संबंधित 6 खास गोष्टी 

रिलिजन डेस्क | Update - Feb 09, 2019, 12:02 AM IST

तिरुपती बालाजी येथे कशामुळे केले जाते केसांचे दान, भगवान बालाजीला व्यंकटेश्वर का म्हटले जाते?

  • unknown facts about tirupati balaji

    दक्षिण भारतातील सर्व मंदिर आपल्या भव्यता आणि सुंदरतेमुळे प्रसिद्ध आहेत, परंतु तिरुपती बालाजीचे मंदिर सर्वात जास्त लोकप्रिय आहे. तिरुपती बालाजीचे मंदिर आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. या मंदिराला भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते, कारण येथे दररोज लाखो-कोटींचे दान केले जाते. या व्यतिरिक्त बालाजीमध्ये काही अशा गोष्टी आहेत, ज्या सर्वात अनोख्या आहेत. येथे जाणून घ्या, तिरुपती बालाजीशी संबंधित 7 अनोख्या आणि रोचक गोष्टी...

    1. यामुळे केले जाते केसांचे दान
    तिरुपती बालाजीला भगवान विष्णूंचे एक रूप मानले जाते. यांना प्रसन्न केल्यानंतर देवी लक्ष्मीची कृपा आपोआप प्राप्त होते आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात. धार्मिक मान्यतेनुसार, जो व्यक्ती स्वतःच्या मनामधील सर्व पाप आणि वाईट सवयी येथे सोडून देतो, त्याचे सर्व दुःख देवी लक्ष्मी नष्ट करतात. यामुळे येथे स्वतःमधील सर्व वाईट सवयी आणि पापांना लोक केसाच्या रुपात सोडून जातात. ज्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू त्यांच्यावर प्रसन्न होऊन नेहमी धन-धान्याची कृपा कायम ठेवतील.


    2. भक्तांना दिले जात नाही तुळशी पत्र
    भगवान श्रीकृष्ण आणि विष्णूला तुळस अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते. यामुळे यांच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचे विशेष महत्त्व आहे. सर्व मंदिरांमध्ये देवाला अर्पण करण्यात आलेले तुळशी पत्र नंतर प्रसाद स्वरुपात भक्ताला परत दिले जाते. इतर वैष्णव मंदिरांप्रमाणे येथेही देवाला दररोज तुळशी पत्र अर्पण केले जाते, परंतु ते भक्तांना प्रसाद रुपात दिले जात नाही. पूजा झाल्यानंतर तुळशी पत्र मंदिराजवळील एक विहिरीत टाकले जाते.


    3. स्वतः प्रकट झाली ही मूर्ती
    स्थानिक मान्यतेनुसार, येथे मंदिरात स्थापित काळ्या रंगाची दिव्य मूर्ती कोणीही तयार केली नसून ती स्वतः जमिनीतून प्रकट झाली होती. स्वतः प्रकट झाल्यामुळे या मूर्तीचे विशेष महत्त्व आहे. व्यंकटांचल पर्वताला लोक देवाचे स्वरूप मानतात. यामुळे येथे चप्पल-बूट घालून लोक जात नाहीत.


    4. संपूर्ण मूर्तीचे दर्शन केवळ शुक्रवारीच होते
    मंदिरात बालाजीचे दिवसातून तीन वेळेस दर्शन होते. पहिले दर्शन विश्वरूप, जे सकाळी होते. दुसरे दर्शन दुपारी आणि तिसरे दर्शन रात्री होते. या व्यतिरिक्त इतरही दर्शन आहेत, ज्यासाठी शुक्ल आकरण्यात आले आहेत. पहिल्या तीन दर्शनांसाठी कोणतेही शुल्क नाही. भगवान बालाजीच्या पूर्ण मूर्तीचे दर्शन केवळ शुक्रवारी सकाळी अभिषेक करताना केले जाऊ शकते.


    5. का म्हणतात भगवान विष्णूला व्यंकटेश्वर
    या मंदिराविषयी सांगितले जाते की, हे मेरु पर्वताच्या सात शिखरांवर वसलेले आहे. जे भगवान शेषनागचे प्रतिक मानले जाते. या मंदिराला शेषांचल असेही म्हटले जाते. शेषनागाच्या सात फण्यांना शेषाद्री, नीलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, वृशटाद्री, नारायणाद्री, आणि व्यंकटाद्री मानले जाते. यामधील व्यंकटाद्री नामक फणीवर भगवान विष्णू विराजित आहेत आणि याच कारणामुळे यांना व्यंकटेश्वर नावाने ओळखले जाते.


    6. यात्रेचे आहेत काही नियम
    तिरुपती बालाजी यात्रेचे काही नियमही आहेत. या नियमानुसार, तिरुपतीचे दर्शन करण्यापूर्वी सर्वप्रथम कपिल तीर्थावर स्नान करून कपिलेश्वरचे दर्शन करावे लागते. त्यानंतर व्यंकटांचल पर्वतर जाऊन बालाजीचे दर्शन करावे. तेथून आल्यानंतर तिरुण्चानूर येथे जाऊन पद्मावतीचे दर्शन करण्याची परंपरा आहे.


    7. रामानुजाचार्यांना येथेच बालाजीने दिले साक्षात दर्शन
    येथे बालाजी मंदिराव्यतिरिक्त इतरही मंदिर आहेत, उदा- आकाश गंगा, पापनाशक तीर्थ, वैकुंठ तीर्थ, जालावीतीर्थ, तिरुच्चानूर. हे सर्व ठिकाण देवाच्या लीलांशी संबंधित आहेत. असे सांगितले जाते की, श्री रामानुजाचार्य तब्बल दीडशे वर्ष जिवंत राहिले आणि त्यांनी आयुष्यभर भगवान विष्णुंची सेवा केली. या सेवेच्या फलस्वरुपात येथेच भगवान विष्णूंनी त्यांना साक्षात दर्शन दिले.

Trending