आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामायण : लक्ष्मणाने याचठिकाणी कापले होते शूर्पणखाचे नाक आणि रावणाने कोठून केले होते सीता हरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ज्योर्तिर्लिंगाजवळील पंचवटी हे रामायणातील एक खास ठिकाण आहे. रावणाने सीता देवीचे हरण पंचवटी मधून केले होते. याच कारणामुळे हिंदू धर्मात या जागेला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पंचवटी संबंधीत खास गोष्टी, ज्यामुळे हे ठिकाण खास आहे...


यामुळे म्हटले जाते पंचवटी
या ठिकाणाचे नाव पंचवटी असण्यामागे एक खास कारण आहे. मानले जाते की, या ठिकाणी वडाची पाच वृक्ष होती, ज्यामुळे या ठिकाणाला पंचवटी म्हटले जाते.


याच ठिकाणे लक्ष्मणाने कापले होते शूर्पणखाचे नाक 
ग्रंथांप्रमाणे, रावणाची बहिण शूर्पणखाने राम-लक्ष्मणासमोर याच ठिकाणी विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता आणि सीतेला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा परिणाम म्हणून लक्ष्मणाने येथेच शूर्पणखाचे नाक कापले होते. याच गोष्टीचा सूड घेण्यासाठी रावणाने सीतेचे हरण केले होते.


या कारणामुळे या ठिकाणाचे नाव नाशिक पडले
असे मानले जाते की, या ठिकाणाचे नाव नाशिक पडण्यामागे येथील एक घटना कारणीभूत आहे. याच ठिकाणी लक्ष्मणाने सुर्पनखाचे नाक कापले होते म्हणजेच नासिका कापली होती. यामुळे या ठिकाणाचे नाव नाशिक म्हणून प्रसिध्द आहे.


या ठिकाणी सीता देवी करत होत्या आराम 
पंचवटीमध्ये सुंदर-नारायण मंदिराच्या काही अंतरावर सीता गुहा आहे, ज्यामध्ये राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्त्या ठेवल्या आहेत. म्हटले जाते की, दडकारण्य क्षेत्र पार करण्याच्या काळात सीता याच गुहेत थांबली होती. 


खास आहे येथील काळाराम मंदिर
पंचवटी मंदिरांमधील काळाराम नावाचे मंदिर प्रमुख मंदिर मानले जाते. मान्यतांप्रमाणे, जेथे श्रीराम पंचवटी आले होते, तेव्हा त्यांनी याच ठिकाणी आराम केला होता. मंदिरात राम, लक्ष्मण आणि सीतेची काळ्या रंगाची मूर्ति आहे.


देवाच्या चरणांवर वर्षातून एकदा पडतो सुर्य किरण
पंचवटीमध्ये सुंदर नारायण नावाचे एक मंदिर आहे. मंदिराच्या गर्भ गृहात तीन रंगाच्या काळ्या मुर्त्या आहेत. यातील मधील मुर्ती ही नारायण देवाची आहे तर आजुबाजूला लक्ष्मीच्या मूर्त्या आहेत. हे मंदिर अत्यंत खास आहे. कारण याची रचना करताना अशी केली आहे की, वर्षाच्या प्रत्येक 20 किंवा 21 तारखेला मूर्त्यांच्या चरणांवर सूर्य किरण पडतात. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास गोष्टी....

बातम्या आणखी आहेत...