आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय योद्धा नव्हता रावण, श्रीरामापूर्वी महादेवांव्यतिरिक्त या 3 वीरांकडून पराभूत झाला होता रावण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 8 ऑक्टोबरला दसरा आहे. त्रेता युगामध्ये याच तिथीला प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता. श्रीरामापूर्वी रावण 4 वेळेस युद्ध हरला होता. रावण महादेव, राळ बळी, वानर बाली आणि सहस्त्रबाहू  अर्जुन यांच्याकडून पराभूत झाला होता.

  • बालीने रावणाला पराभूत केले

एकदा रावण बालीसोबत युद्ध करण्यासाठी गेला. बाली त्यावेळी पूजा करत होता. रावण वारंवार बालीला युद्धासाठी आव्हान देत होता. यामुळे बालीच्या पूजेमध्ये व्यत्यय येत होता. जेव्हा रावणाने ऐकले नाही तेव्हा बालीने त्याला आपल्या काखेत दाबून चार समुद्रांची परिक्रमा केली होती. बाली खुप शक्तिशाली आणि चपळ होता. सकाळी सकाळी चारी समुद्रांची तो परिक्रमा करत असे. अशाप्रकारे पूजा करुन तो सूर्याला अर्घ्य अर्पित करत होता. बालीने परिक्रमा पुर्ण करेपर्यंत रावणाला काखेत दाबून ठेवले आणि रावण बालीच्या कैदेतून सुटू शकला नाही. पूजेनंतर बालिने रावणाला सोडून दिले.

  • राजा बळीच्या महालात रावणाचा पराभव

दैत्यराज बळी पाताळलोकाचे राजा होते. एकदा रावण, राजा बळीसोबत युद्ध करण्यासाठी पाताळलोकमधील त्यांच्या महालात गेला. तेथे गेल्यानंतर रावणाने बळीला युद्धाचे आव्हान दिले. त्यावेळी महालात खेळत असलेल्या लहान मुलांनीच रावणाला घोड्यांसोबत बांधले होते. अशा प्रकारे राजा बळीच्या महालात रावणाचा पराजय झाला.

  • सहस्त्रबाहु अर्जुनकडून पराभूत झाला रावण

सहस्त्रबाहु अर्जुनाचे एक हजार हात होते, यामुळेच त्याचे नाव सहस्त्रबाहु पडले. जेव्हा रावण सहस्त्रबाहुसोबत युध्द करण्यास पोहोचला तेव्हा सहस्त्रबाहुने आपल्या हातांनी नर्मदेचा प्रवाह थांबवला. सहस्त्रबाहुने नर्मदेचे पाणी जमा केले आणि सर्व पाणी एकदाच सोडले ज्यामुळे रावण पुर्ण सेनेसोबत नर्मदेत वाहुन गेला. या पराभवानंतर रावण पुन्हा सहस्त्रबाहु अर्जुनासोबत युध्द करण्यास पोहोचला होता. तेव्हा सहस्त्रबाहुने त्याला बंदी बनवुन कारागृहात टाकले.

  • महादेवाकडुन पराभव

रावण खुप शक्तिशाली होता. त्याला आपल्या शक्तीवर खुप गर्व होता. याच गर्वात तो महादेवाला हरवण्यासाठी कैलास पर्वतावर गेला. रावणाने महादेवाला युद्धासाठी आव्हान दिले. परंतु महादेव ध्यानात मग्न होते. रावण कैलास पर्वत उचलू लागला. यावेळी महादेवांनी पायाच्या अंगठ्याने कैलास पर्वताला दाबले आणि पर्वताचे वजन वाढले. हे वजन रावणाला सहन झाले नाही आणि तो पर्वताखाली दबला. या पराभवानंतर रावणाने महादेवाला गुरु मानले.