आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी केला हल्ला, वाहनांची केली तोडफोड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -  कन्नड मतदारसंघातील  अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या औरंगाबाद येथील घरावर अज्ञातांनी हल्ला केला. काल मध्यरात्रीच्या सुमारास हल्लेखोरांनी हर्षवर्धन यांच्या घरावर दगडफेक करत गाड्यांची तोडफोड केली. घरावर हल्ला झाला त्यावेळी हर्षवर्धन घरी नव्हते. ते प्रचारासाठी मतदारसंघात आहेत. मात्र त्यांच्या पत्नी संजना जाधव आणि मुलगा हे घरीच होते. दरम्यान या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस तपास करत आहेत. 
 

हल्लेखोरांनी 'जय शिवाजी जय भवानी'च्या घोषणा दिल्या 
दरम्यान दगडफेक करताना आरोपींनी 'जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा दिल्याचे हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांनी सांगितले. 'पाठीमागून हल्ला करण्याऐवजी समोरासमोर सामना करावा. पराभव समोर दिसत असल्याने ही गुंडगिरी सुरु आहे' असे संजना म्हणाल्या. 
 
 

हर्षवर्धन यांनी उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीवर जाऊन केली होती टीका 
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेही भाजपकडे असणारा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ स्वतःकडे घेत सत्तारांना उमेदवारी दिली. सत्तारांना दिलेल्या प्रवेशाबाबत हर्षवर्धन जाधव यांनी "जर शिवसेनेला मुस्लिमांचे वावडे आहे, तर मग सत्तारांना शिवसेनेत कसे घेतले?", असा सवाल करताना उद्धव ठाकरेंबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या टीकेमुळेच हर्षवर्धन यांच्या घरावर हल्ला झाल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे.