आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव पाटील यांना धमकीचे फोन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद / पुणे - 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवर काही नाराज व्यक्ती समाज माध्यमातून व फोनवर शिवराळ भाषेत धमकी देत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक कौतिकराव ठालेपाटील यांना या धमक्या येत आहेत. दिव्य मराठीने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक कौतिकराव ठालेपाटील व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व मसाप कार्यालयात द्वेषमूलक फोन येत आहेत व पाहून घेऊ अशी धमकी दिली जात आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी (26 सप्टेंबर) होणाऱ्या फादर दिब्रिटो यांच्या सत्कार समारंभात अडथळा निर्माण होऊ नये असे विनंती पत्र / तक्रार पुणे शहर पोलिस सह आयुक्त श्री. रवींद्र शिसवे यांना दिल्याचे मसाप प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी सांगितले. या कार्यक्रमास स्वतः शिसवेसाहेब उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी मान्य केले आहे तसेच संपूर्ण सुरक्षेची हमी दिली आहे. धमकी देणारे फोन बनावट नावे केले जातात असेही पायगुडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...