आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अनलाइकली हँडशेक्स’ केवळ व्यवसायासाठी, जीवनासाठी नाही

एका वर्षापूर्वीलेखक: एन. रघुरामन
  • कॉपी लिंक

रविवारी सायंकाळी उशिरा मी भोपाळ विमानतळावरून रेल्वेस्थानकाकडे निघालो होतो. तेथून मला सतनाला जायचे होते. मुसळधार पाऊस सुरू होता. हा बिगरमोसमी पाऊस. रेल्वेने जाताना मी जवळ ओझे जास्त बाळगत नाही. त्याची अनेक कारणे आहेत. ओझे असेल तर त्यासाठी मी कामगार आहे का हे बघतो. सामान ओढताना खालची नितळ फरशी खराब होऊ नये याची काळजी मी घेत असतो. तर अशा या मुसळधार पावसात भोपाळच्या प्लॅटफॉर्मवर एक बातमी वाचली. टेक्सटाइलपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत, औषधांपासून ते रोपट्यांच्या कीटकनाशकांपर्यंत आणि बुटांपासून सुटकेसपर्यंत भारत सरकार असे १,०५० प्रकारचे साहित्य जगभर शोधत आहे. कोरोनामुळे चीनमधून येणारा पुरवठा बऱ्यापैकी थांबला आहे. भारतात ५० टक्के आयात चीनहून होते. हेच काळजीचे कारण आहे. वृत्तानुसार काही क्षेत्रात सरकार खरेदीत प्राथमिकता ठेवणार आहे. शक्य असेल तेथे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. हेच कदाचित भारतीय व्यवसायासाठी अनपेक्षित व्यापार उद्योगांकडून ‘अनलाइकली हँडशेक्स’साठी (हात मिळवण्याच्या अशक्य वाटणाऱ्या संधी) संधी आहे. ५३ वर्षीय कुमार मंगलम असाच सल्ला देतात. बिर्ला यांनी नुकताच सोशल मीडियावर १० पानांचा दीर्घ लेख लिहिला आहे. गेल्या काही वर्षांत ते जे शिकले त्याचे हे सार आहे. त्यांना वाटते की, सर्व उद्योगांच्या वाढीचे पुढचे पाऊल म्हणजे अनपेक्षित हातमिळवणी. व्यवसायात नाव कमावणारे युग कधी येईल? अशीच साधने त्यासाठी उपयोगी ठरतील. ते वेगळे वाटणारे उद्योग आणि कंपनीतून तयार होतील. आपले म्हणणे सांगण्यासाठी ते आरोग्य विमा उद्योगाचे उदाहरण देतात. ते फिटनेस विअरेबल कंपन्या, जिम, फार्मसी, डाएटिशियन्स आणि वेलनेस कोचचे इकोसिस्टिम बनले आहे. जेथे उद्योगात अनपेक्षित हातमिळवणीचा सल्ला दिला जातो, वास्तव जीवनात मात्र केवळ सरकारच नव्हे तर खासगी संस्था, चीन, फ्रान्स, इराण आणि दक्षिण कोरियासारखे देश लोकांच्या भेटीत हात मिळवू नका असा सल्ला देत आहेत. कोरोनामुळे लोक हस्तांदोलन करणेच टाळत आहेत. पुणे महानगरपालिका, इंडियन मेडिकल असोसिएशनसारख्या संस्था मित्र, सहकारी आणि नातेवाइकांना अभिवादनासाठी नमस्कार करायला सांगत आहेत. महापालिकेचा आरोग्य विभाग याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करत आहे. कोरोनाशिवाय स्वाइन फ्लू आणि अन्य विषाणूजन्य रोगांपासून मुक्ती मिळवण्याचा हा उपाय. मुंबईत अनेक ठिकाणी स्वच्छेतबद्दल लोक जागरूक झाले आहेत. वारंवार साबणाने हात धुण्याची सवय अंगीकारली जात आहे. यावरून मला एक आठवले. आपले आईवडील लहान लहान कारणांवरून आपल्याला नेहमी हात धुवायला सांगायचे. माझी आई याबाबत फारच काटेकोर होती. शाळेत जाताना बुटाचे बंद बांधल्यानंतरही मला हात धुवावे लागायचे. मी याच हातांनी पुस्तके धरणार, त्यामुळे तो सरस्वतीचा अपमान ठरेल असे ती म्हणे. आता मागे वळून पाहतो तेव्हा त्यातील बहुपयोगिता दिसते. हाताचे विषाणू पुस्तकांमार्फत पसरले जाण्याचा धोका असतो. 

फंडा असा : उद्योग-व्यवसायाच्या वाढीसाठी ‘अनलाइकली हँडशेक्स’ करावे लागतील. मात्र स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी यापासून चार हात लांबच राहिलेले बरे.

बातम्या आणखी आहेत...