आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलमध्ये रूम बूक करू शकतात Unmarried Couple, पोलिसांनी त्रास दिल्यास करा हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - देशभरात कोणत्याही ठिकाणी आपण बिनधास्तपणे फिरायला जाऊ शकतो. हॉटेलमध्ये रूम बूक करून आपण बिनधास्तपणे राहत असतो. पण अनेकदा अनमॅरिड कपलला रूम बूक करता येत नाही. पोलिसांनी धाड टाकली तर काय? अशी भीती कायम त्यांच्या मनात असते. कारण अनेकदा बातम्यांमध्ये आपण पोलिसांनी छापा मारून अविवाहित जोडप्यांना ताब्यात घेतल्याचे ऐकत असतो. त्यामुळे अनेकदा मित्र-मैत्रिणी किंवा अनमॅरिड कपल हॉटेलमध्ये जायला घाबरत असतात. जर तुम्हाला कायदा नीट माहिती असेल तर तुम्हाला काहीही घाबरण्याची गरजच नाही. 


अशीच महत्त्वाची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. कोणत्याही मुलाने आणि मुलीने एकत्र हॉटेलमध्ये राहणे हा काही गुन्हा नाही. बहुतांश अविवाहित जोडप्यांना कायद्याबाबत आणि अधिकारांबाबत माहिती नसते. त्यामुळे साहजिकच पोलिसांची भीती वाटत असते. पण खरं तर आपल्याला संविधानानुसार मिळालेल्या अधिकारानुसाप तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन नियमानुसार रूम बूक करून राहू शकतात.


काय सांगतो नियम...
नियमानुसार 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या दोन प्रौढ व्यक्ती एकत्रित राहू शकतात. त्यांना आपसातील सहमतीने शारीरिक संबंधही ठेवता येतात. त्यामुळे हॉटेलमध्ये जाऊन राहण्यात काहीही गैर नाही. हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियानुसार असा कोणताही कायगदा नाही की, ज्याद्वारे कुणाला हॉटेलमध्ये रूम बूक करण्यापासून अडवता येईल. फक्त त्यांच्याकडे ओळखपत्र असायला हवे. पोलिस त्यांची चौकशी करू शकतात. पण त्यांना अटक करू शकत नाही.


हे मात्र चुकीचे...
हॉटेलमध्ये एकत्र राहणे हा काही गुन्हा नाही. मात्र सार्वजनिक ठिकाणी काही अश्लिल चाळे किंवा कृत्य केले तर तो मात्र गुन्हा ठरतो, अशा परिस्थितीत पोलिस कारवाई करू शकतात.

 

बातम्या आणखी आहेत...