National / उन्नाव रेप प्रकरणः एम्समध्ये बनवले तात्पुरते कोर्ट, पीडितेचा जबाब नोंदवण्यासाठी पोहोचले न्यायाधीश

उन्नाव प्रकरणात एम्समध्ये भरवले कोर्ट; ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंगवर बंदी

वृत्तसंस्था

Sep 11,2019 12:10:48 PM IST

नवी दिल्ली - उन्नाव बलात्कार प्रकरणात दिल्लीच्या एम्स रुग्णालयात तात्पुरते कोर्ट भरवण्यात आले. याच ठिकाणी बलात्कार पीडितेवर उपचार सुरू आहेत. तिचा जबाब नोंदवण्यासाठी न्यायाधीश बुधवारी सकाळी या ठिकाणी पोहोचले. एम्सच्या जेपी अॅपेक्स ट्रॉमा सेंटरमध्ये हे न्यायालय भरवण्यात आले आहे. 6 सप्टेंबर रोजी हायकोर्टाने रुग्णालयात जाऊन पीडितेचा जबाब नोंदवण्यास मंजुरी दिली होती. जुलै महिन्यापासून पीडित महिला आणि तिचे वकील येथे उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे, या रुग्णालयातील न्यायालयीन प्रक्रियेत मीडियाला परवानगी देण्यात आलेली नाही. सोबतच, कुठल्याही प्रकारची ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार नाही. न्यायाधीशांनी याबाबत कठोर निर्देश जारी केले आहेत.

ट्रकने दिली होती पीडितेच्या कारला धडक
जुलै महिन्यात पीडित तरुणीचे कुटुंबीय तिच्या काकांची भेट घेण्यासाठी जात होते. तिचे काका रायबरेली येथील तुरुंगात कैद आहेत. परंतु, एनएच-32 वर अचानक त्यांच्या कारला भरधाव ट्रकने धडक दिली. स्थानिकांनी मृतांना आणि जखमींना बाहेर काढले आणि आपातकालीन नंबर डायल करून मदत बोलावली. यानंतर पोलिसांनी जखमींना लखनौ येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी मावशी आणि काकूला मृत घोषित केले. तर वकील महेंद्र सिंह, पीडित तरुणी आणि तिची मोठी बहीण गंभीर जखमी झाले. त्या सर्वांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी भाजप आमदार कुलदीप सेंगर सध्या तुरुंगात असून प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू आहे.

X
COMMENT