आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिडितेचे वडील म्हणाले- आरोपींना पळवून गोळी मारावी, प्रियांका गांधी पीडितेच्या कुटुंबियांना भेटल्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ / उन्नाव बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर कुटुंब दुःखामध्ये  आहे. वडिल म्हणाले, "आम्हाला एक पैसाही नको, फक्त मला मुलीला न्याय मिळावा. गुन्हेगारांना उशीर न करता फाशी द्यावी किंवा त्यांना पळवून गोळी मारावी." या घटनेनंतर राजकारणही तापले आहे. सपा अध्यक्ष अखिलेश यादव विधानसभेबाहेर आंदोलन करत आहेत. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी उन्नाव पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. पिडीतेचे वडील म्हणाले "आमच्या कुटुंबाला आरोपी खुलेआम मारून टाकण्याची तसेच केस मागे घेतली नाही तर मुलीला जाळून टाकू अशी धमकी देत होते. पोलिसांना याविषयी सांगितले परंतु त्यांनी दरवेळी टाळाटाळ केली. मुलीच्या मृत्यूची बातमी वर्तमानपत्रातून समजली. पोलीस किंवा प्रशासनाचा कोणताही व्यक्ती हे सांगण्यासाठी आला नाही. आमच्या आमदारानेही विचारपूस केली नाही." पीडितेच्या मृत्यूनंतर उन्नाव जिल्ह्यातील बिहार भागाला छावणीचे रूप आले आहे. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित आहेत. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. ग्रामीण दोन दिवसांपासून घरातच आहेत.

‘जान के बदले जान चाहिए’
दिल्ली येथील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये पीडितेच्या आईने रडत-रडत सांगितले की, "आमचे वाईट करण्यात त्या लोकांनी कोणतीही कमी ठेवली नाही. आम्ही उद्धवस्त झालो. ज्याप्रमाणे आमच्या मुलीचा जीव गेला आम्हालाही त्यांचा जीव हवा आहे." पीडितेच्या भावाने सांगितले की, मी सध्या काहीही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही, आमच्यासोबत आता आमची बहीण नाही. पाचही आरोपींना फाशी देण्यात यावी, यापेक्षा दुसरे काही नको."

आता मी हे युद्ध लढेन : पीडितेची बहीण...
पिडीतेपेक्षा एका वर्षाने मोठी असलेली तिची बहीण म्हणाली, ‘‘आमची बहीण आमचा आधार होती. ती लहान नक्कीच होती पण आमच्या कुटुंबासाठी प्रेरक होती. आम्ही तिच्या मृत्यूनंतर शांत बसणार नाही. आता आम्ही तिची लढाई लढू. जोपर्यंत आरोपींना शिक्षा मिळत नाही. तोपर्यंत आमची सुरूच राहील. मला आरोपींनी आधीच बदनाम केले आहे. आता काहीही होवो, मलादेखील जाळले तरी चालेल. मी माझ्या बहिणीच्या हत्यारांना सोडणार नाही. मृतदेहाचे पोस्टमाॅर्टम झाल्यानंतर आम्ही लोक सरळ उन्नाव आपल्या गावी जाऊ. अंत्यसंस्कार तिथेच होईल.’’