आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Unnao Rape | Unnao Rape Latest News: Unnao Rape Victim Accused Threatened, Accused Puts Up Posters In Baghpat

बलात्कार पीडितेच्या घरावरच चिटकवले धमकीचे पोस्टर, कोर्टात काही सांगितले तर...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - देशात बलात्कार करणाऱ्यांचे निर्लज्जपणा किती वाढला याचे एक धक्कादायक उदाहरण गुरुवारी समोर आले आहे. यामध्ये आरोपीने तरुणीवर आधी बलात्कार केला. पीडितेने पोलिसांत तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हा मोकाट फिरताना या नरपशूने चक्क तरुणीच्या घराबाहेर धमकीचे पोस्ट लावले. यामध्ये कोर्टात काही सांगितल्यास उन्नाव बलात्कार पीडितेपेक्षा गंभीर हाल करू असे धमकावले. काही दिवसांपूर्वीच उन्नावमध्ये कोर्टात जाणाऱ्या बलात्कार पीडितेला वाटेतच जिवंत जाळण्यात आले. तिचे आरोप जामिनावर सुटले होते. दरम्यान, बागपतच्या या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करायचा आरोपी

पीडित तरुणी गतवर्षी शिक्षणासाठी दिल्लीला गेली होती. दिल्लीत तिच्या परिसरातच गावातला सोरण हा युवक सुद्धा राहत होता. सोरणने नोट्सच्या बहाण्याने पीडितेला आपल्या मित्राच्या फ्लॅटवर नेले. याच ठिकाणी तिच्या कोल्ड्रिंकमध्ये बेशुद्ध करण्याच्या औषधी मिसळून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेचा त्याने व्हिडिओ देखील बनवला. यावरून वारंवार तिला ब्लॅकमेल केले. जुलै 2018 मध्ये पीडितेने दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली.

कुटुंबियामध्ये दहशत, आजोबांनी गाठले पोलिस स्टेशन

या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. परंतु, वेळीच तो जामिनावर सुटला. यामध्ये दिल्लीतील कोर्टात 13 डिसेंबर (शुक्रवार) रोजी सुनावणी होणार आहे. त्यातच आरोपीने बुधवारी पीडितेचे घर गाठले आणि घराबाहेर पोस्ट चिटकवून धमकी दिली. उन्नाव पीडितेपेक्षा भंयकर यातना देण्याच्या या धमकीवरून समस्त कुटुंबीय दहशतीमध्ये होते. यानंतर पीडितेच्या आजोबांनी पोलिसांत तक्रार केली आणि नराधमाला जेलमध्ये डांबण्यात आले. या घटनेची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून पीडितेला संरक्षण दिले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...