आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Unnao Rape | Unnao Rape Survivor Critical: Unnao Rape Case Victim Health Condition News Updates After Woman Set On Fire On Her Way To Rape Case Hearing

बलात्कार पीडितेची जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी! आरोपींनी कोर्टात जाताना जिवंत जाळले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ / नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या उन्नाव बलात्कार पीडितेची जिवंत वाचण्याची शक्यता फारच कमी असल्याचे डॉक्टरांनी शुक्रवारी सांगितले आहे. बलात्कार प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपींनी पीडितेला गुरुवारी सुनावणीसाठी जात असताना जिवंत जाळले. यात ती 90 टक्के भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरुवातीला तिला उपचारासाठी लखनऊच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात नेण्यात आले. तिच्यावर उपचार करणारे अधिष्ठाता डॉक्टर सुनील गुप्ता यांनी सांगितल्याप्रमाणे, तिला जीवनरक्ष प्रणालीवर ठेवण्यात आले असून तिची प्रकृती अतिशय नाजूक आहे. डॉक्टरांकडून तिला वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तरीही ती जिवंत राहील याची शक्यता फार कमी आहे.

भूत म्हणून पळाले स्थानिक, अशी मिळवली मदत

पीडितेला जिवंत जाळणारे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवण्यात आले. पेटलेली असतानाही ती किंचाळत पळत गेली. संपूर्ण शरीर भाजत असताना स्थानिकांनी तिची विचारपूस केली. परंतु, प्रत्यक्षदर्शी तिला भूत समजून भयभीत झाले आणि पळ काढला. एकाने काठी आणि कुऱ्हाड घेऊन पुन्हा तिची विचारपूस केली तेव्हा तिने आपल्या वडिलांचे नाव सांगितले. यानंतर फोन करून रुग्णवाहिका आणि पोलिसांना बोलावण्यात आले.

काय आहे प्रकरण?

पीडित तरुणीला तिच्याच गावातील शिवम नावाच्या युवकाने लग्नाचे अमीष देऊन बलात्कार केला. तसेच या घटनेचा अश्लील व्हिडिओ बनवून तिले ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. याला कंटाळून पीडित तरुणी आपल्या रायबरेली येथील आत्याकडे गेली. त्या ठिकाणी सुद्धा शिवमने तिचा पाठलाग केला. तसेच शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर 5 मार्च 2018 रोजी कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. कोर्टाच्या आदेशानंतर दोन आरोपी शिवम आणि शुभम यांना अटक करण्यात आली होती. 3 डिसेंबर रोजी आरोपी जामीनावर सुटले आणि कोर्टात सुनावणीसाठी जाणाऱ्या पीडितेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवले. पोलिसांनी या प्रकरणी शिवम, त्याचे वडील रामकिशोर, शुभम, हरिशंकर आणि उमेश बाजपेयी यांना अटक केली.
 

बातम्या आणखी आहेत...