आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षीय चिमुकल्यावर २२ वर्षीय नराधमाने केले अनैसर्गिक कृत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- दहा वर्षीय अल्पवयीन चिमुकल्यावर एका २२ वर्षीय नराधमाने अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध बाललैँगिंक प्रतिबंधक कायदा व पोस्को कायद्यानुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे बुधवारी रात्री दाखल केले. 


महाकालीनगरात राहणाऱ्या भारत आनंदराव सावळे हा चिमुकल्याला परिसरातीलच महापालिकेच्या शाळेमध्ये संध्याकाळी घेऊन गेला. शाळेच्या गच्चीवर त्याने मुलाला धाक दाखवून जबरदस्तीने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. मुलाला घरी गेल्यानंतर त्याला त्रास होत असल्याचे पालकांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याला विचारपूस केली असता त्याने त्याच्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर वडिलांच्या पायाखालची वाळूच सरकली. पालकांनी बुधवारी रात्रीच पोलिस ठाणे गाठले व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. मुलाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भारत आनंदराव सावळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास ठाणेदार अन्वर एम. शेख करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...