आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळच्या ‘एमआर’ युवकावर नाशकात नऊ जणांकडून अनैसर्गिक अत्याचार, बारा हजारांची राेकड, बॅगही लुटून नेली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - केरळमध्ये राहणाऱ्या मेडिकल अौषध पुरवठा करणाऱ्या युवकावर नाशिकमधील रिक्षाचालकासह नऊ आराेपींनी सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार  बुधवारी उघडकीस अाला. नराधमांनी युवकाच्या गुप्तांगात बिअरची बाटली टाकून त्यास बेदम मारहाण केली.

  
३२ वर्षीय पीडित युवक दोन वर्षांपासून अंधेरीतील एका औषध कंपनीत नोकरीस आहे. काही वर्षांपासून ताे गंगापूर रोडवरील एका मेडिकल व हाॅस्पिटलला औषध पुरवठा करण्यासाठी नाशिकला येत होता. मंगळवारीही तो आला होता. रेल्वेस्थानकावर उतरून रात्री अकरा वाजता तो भद्रकाली परिसरातील हाॅटेलमध्ये आला होता. रात्री बारा हाॅटेलमध्ये जाण्यासाठी रिक्षामध्ये बसला. मात्र, रिक्षाचालक त्यास दामोदर सिनेमाजवळ घेऊन आला.  येथे ९ तरुण मस्ती करत होते. यातील चार जण रिक्षात बसले आणि इतर चाैघे दुचाकीने मागे येत होते.  रिक्षा गोदाकाठावर  झाडीमध्ये नेत दाेन आराेपींनी युवकाला जबरदस्तीने बिअर पाजली व सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केला. एवढ्यावरच हे नराधम थांबले नाहीतर त्यांनी युवकाच्या गुप्तांगात बिअरची बाटली टाकली. काही जण  टूथपिन टोचत युवकाला यातना देत त्याच्यावर रात्रभर अत्याचार करत होते.

 

बारा हजारांची राेकड, बॅगही लुटून नेली
संशयितांनी बारा हजारांची रोकड, मोबाइल,  पॅन कार्ड, आधार कार्ड असलेली बॅग लुटून नेली. पीडित युवकाने कशीबशी सुटका करून घेत मंदिरात रात्र काढली. सकाळी गस्तीवर असलेल्या पाेलिसांचे वाहन थांबवून त्याने घडलेला प्रकार कथन केला. या प्रकरणी पाेलिसांनी अज्ञात आराेपींविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...