आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Unnav Rape Case : The Accused, Who Were Released On Bail, Burnt The Girl News And Updates

जामिनावर सुटलेल्या आरोपींचा पीडितेला जाळून मारण्याचा प्रयत्न; प्रकृती गंभीर

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

लखनऊ/ उन्नाव - हैदराबादेत एका व्हेटरनरी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याने देशभर रोष असताना उत्तर प्रदेशात काही नराधमांनी बलात्कार पीडितेला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. जामिनावर सुटलेल्या सामूहिक बलात्कारातील दोन आरोपींनी तिघांच्या मदतीने गुरुवारी पहाटे पीडितेला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. आगीच्या ज्वाळांनी वेढलेली ही पीडिता मदतीची याचना करत एक किमी अंतर पळत गेली आणि कोसळली. पीडितेचा आवाज ऐकून घराबाहेर आलेले रवींद्र प्रकाश यांनी तिच्या अंगावरील कपड्यांना लागलेली आग विझवली आणि पोलिसांना कळवले. पीडिता ९० टक्के भाजली असून तिला उपचारांसाठी तातडीने विमानाने दिल्लीत हलवण्यात आले. उन्नाव जिल्ह्यातील या घटनेने पुन्हा एकदा उत्तर प्रदेश हादरले आहे. दरम्यान, या घटनेनंतर संसदेत काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला जाब विचारत गोंधळ घातला. यामुळे राज्यसभेची कार्यवाही दुपारी १२ पर्यंत तहकूब करण्यात आली. 

गेल्या डिसेंबरमध्ये झाला होता बलात्कार :


पीडितेवर उपचारांदरम्यान उपविभागीय दंडाधिकारी दयाशंकर पाठक यांनी सांगितले की, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पीडितेवर सामूहिक बलात्कार झाला होता. चार महिन्यांनंतर मार्चमध्ये गुन्हा दाखल झाला. तारखेला हजर राहण्यासाठी ती उन्नावहून रायबरेलीला जात असताना वाटेत हरिशंकर त्रिवेदी, रामकिशोर त्रिवेदी, उमेश वाजपेयी, शिवम त्रिवेदी आणि शुभम त्रिवेदी यांनी हल्ला केला आणि तिला पेटवून दिले. शिवम आणि शुभम त्रिवेदी यांनी आग लावल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. यांनीच गेल्या वर्षी तिच्यावर बलात्कार केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना पाेलिसांनी पकडले होते. वादग्रस्त वक्तव्य...
 
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वढेरा यांनी याबाबत ट्विट केले की, उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्था सुरळीत असल्याचे बुधवारी देशाच्या गृहमंत्र्यांनी आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. भाजप नेत्यांनी या खोटा प्रचार थांबवला पाहिजे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या घटनेची जबाबदारी घेऊन उत्तर प्रदेश सरकारने राजीनामा द्यावा, असे नमूद केले. यावर योगी आदित्यनाथ सरकारमधील अन्नपुरवठा मंत्री रणवेंद्र प्रतापसिंह यांनी कहर केला. ते म्हणाले, समाजातील गुन्हेगारी रोखण्याची हमी भगवान श्रीरामही देऊ शकले नाहीत. गुन्हेगार तुरुंगात जातील, याची हमी नक्की देऊ.