आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लायकी नसलेले लोक सावरकरांवर उगाच टीका करतात : विक्रम गोखले 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - स्वातंत्र्यवीर सावरकर हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांना हिंदुत्व समजले. संपूर्ण जग त्यांना ओळखते. मात्र, त्यांचे नाव घेण्याची लायकी नसलेले लोक त्यांच्यावर टीका करत आहेत, अशा खरमरीत शब्दांत सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांचा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी बुधवारी समाचार घेतला. 


कारगिल युद्धाला २६ जुलैला २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून 'सरहद' संस्थेतर्फे आयोजित कारगिल विजय दिवस कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते माजी उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल (निवृत्त) मोती धर यांचा विशेष सत्कार करण्यात आला, तर 'आयर्न मॅन' स्पर्धेचा किताब पटकावणारे दशरथ जाधव, कारगिल येथील पर्यावरणवादी कार्यकर्ते काचो अहमद खान, पत्रकार राखी बक्षी यांना कारगिल गौरव पुरस्काराचेही वितरण करण्यात आले. 'सरहद'चे संजय नहार, फिशर मेजरमेंट टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक राकेश भान, कारगिल मॅरेथॉनचे संजीव शहा, डॉ. संजय पर्वा यावेळी उपस्थित होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोखले बोलत होते. गोखले म्हणाले, सावरकर यांच्या जयंतीची दिवशी ते नायक की खलनायक यावर चर्चा होते. 


सावरकर ही अशी एकच व्यक्ती आहे ज्यांनी दलितांना जवळ करा म्हटले आहे. मुळात असा कार्यक्रम घेणाऱ्यांना लाज वाटायला हवी. सावरकरांवर टीका करणाऱ्यांचे नाव घेण्यात मी माझी शक्ती व वेळ खर्च करू इच्छित नाही. काश्मीर प्रश्न हा दिल्ली आणि इस्लामाबादला सुरूच ठेवायचा आहे. तेथील नागरिकांना मात्र शांतता हवी आहे. हा प्रश्न केवळ लढाईने सुटणार नाही. ज्यांना युद्ध हवे आहे त्यांनी इतिहासातून अनुभव घेतला नाही. शिंदे यांच्याएवढा चांगला माणूस मी राजकारणात पाहिला नाही. पण ते चुकीच्या रस्त्यावर जात आहेत. ते योग्य पक्षात असते तर कुठच्या कुठे पोहोचले असते.' 


माझा मार्ग कधीच चुकला नाही : सुशीलकुमार शिंदे 
विक्रम गोखले यांच्या टिप्पणीला उत्तर देताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, माझा मार्ग कधीच चुकला नाही. मी ज्या पक्षात आहे, त्या पक्षाने मला आजपर्यंत भरभरून दिले. एका शिपायाला लोकसभेचा नेता बनवले. देशाचे गृहमंत्रिपद भूषवण्याची संधी दिली. मला जे कार्य करायचे होते ते मी केले.