sport / अनोखी आशिया पॅसिफिक राेबाेकप स्पर्धा सुरू; इटली, रशिया, अमेरिकेसह जगातील १०३ संघांचा सहभाग

राेबाेट्ससाठी खास तयार केलेली वेगवेगळी मैदाने
 

वृत्तसंस्था

May 20,2019 11:19:36 AM IST

बीजिंग - चीनमधील तियांजिन शहरात आशिया पॅसिफिक राेबाेकप स्पर्धा २०१९ सुरू झाली आहे. दाेन दिवस सुरू असलेल्या या कार्यक्रमात जगभरातील १०३ संघ सहभागी झाले आहेत. यात चीन, अमेरिका, रशिया आणि इटलीसह अनेक देशांचा सहभाग आहे. या टुर्नामेंटच्या पहिल्याच दिवशी फुटबाॅलचा सामना झाला. यात अनेक श्रेणीत राेबाेट्सनी सामने खेळले. फुटबाॅल सामने खेळणाऱ्या दाेन्ही संघांतून ६-६ राेबाेट्स मैदानात उतरले हाेते. हे सर्व आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड हाेते. आयाेजकांनी दिलेल्या माहितीनुसार, असे टुर्नामेंट राेबाेटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) एज्युकेशन आणि रिसर्च क्षेत्रात काम करण्यासाठी आयाेजित केले जातात. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे.


राेबाेट्ससाठी खास तयार केलेली वेगवेगळी मैदाने
या स्पर्धेमध्ये राेबाेट्सच्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे सामने सुरू असताना राेबाेट डिस्चार्ज हाेतात. तेव्हा त्यांचे आॅपरेटर त्यांना मैदानाबाहेर नेऊन चार्ज करतात. असे अनाेखे सामने पाहण्यासाठी राेबाेटिक उद्याेगातील जगभरातील लाेक येथे येतात. कारणस्पर्धेमध्ये दरवर्षी १०० पेक्षा जास्त प्रकारचे राेबाेट्स पाहण्यास मिळतात.

X
COMMENT