आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Unusual Punishment For Breaking Traffic Rules, Penalty Of 2 Hours Class And Fine Will Be Return After Showing Certificate

ट्रॅफिक नियम तोडणाऱ्यास अनोखी शिक्षा, वाहतुकीचे नियम मोडले तर 2 तासांचा वर्ग आणि प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच दंड परत

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

सरफराज कुरेशी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे वाहतूक नियम मोडणाऱ्यांना अनोखी शिक्षा देण्यात येत आहे. नियम मोडल्यानंतर आधी त्यांची पावती फाडली जाते. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेफ्टी ड्रायव्हिंग एज्यूकेशन सेंटरमध्ये दोन तासाचा वर्ग घेण्याची सक्ती करण्यात येते. त्याचे प्रमाणपत्र मिळते. ते दाखवल्यानंतरच दंडाची रक्कम परत मिळते. आता ड्रायव्हिंग सेंटरमध्ये फक्त नवा परवाना घेणाऱ्या उमेदवारांनाच नव्हे तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची रांग लागली होती. नोव्हेंबरमध्ये २८७ व डिसंेबर महिन्यात आतापर्यंत १०१ म्हणजे ३८८ लोकांनी वाहतूक नियम मोडल्यानंतर दंड जमा करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. ज्यांनी प्रशिक्षण वर्गात हजेरी लावली त्यांचेच पैसे परत मिळतात. ज्यांनी प्रमाणपत्र घेतले नाही, त्यांना दंडाची रक्कम परत मिळणार नाही. नियमानुसार, दंडाची पावती जमा न केल्यास वाहतूक पोलिस पोस्टाने गाडीच्या नोंदणी क्रमांकाच्या पत्त्यावर दंडाची पावती पाठवली जाते. त्यांना १५ दिवसात रक्कम भरावी लागते.

दोन तासांच्या वर्गाचा सकारात्मक आढळला परिणाम

रांचीचे वाहतूक अधीक्षक अजित पीठर यांनी सांगितले, याचा सकारात्मक परिणाम दिसतो आहे. दोन तास वर्गात बसण्याचे टाळण्यासाठी लोक आता नियमाचे पालन करत आहेत.