Home | National | Delhi | unwell Sheela Dikshit wanted to quit from cm post in 2012

शीला दीक्षित यांना 2012 मध्ये सोडायचे होते मुख्यमंत्रीपद; पण निर्भया प्रकरणानंतर निर्माण झालेल्या परिस्थितींमुळे बदलले मन

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 21, 2019, 01:19 PM IST

निर्भया प्रकरणावेळी राजीनामा देणे युद्धभूमी सोडण्यासारखे होते - शीला दीक्षित

 • unwell Sheela Dikshit wanted to quit from cm post in 2012

  नवी दिल्ली - दिल्लीच्या माजी उपमुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे शनिवारी दुपारी कार्डियाक अॅटॅकमुळे निधन झाले. त्यांनी 1998 ते 2013 पर्यंत सलग तीन वेळेस दिल्लीचे मुख्यमंत्री पद भूषवले. यादरम्यान अशी वेळ आली होती की, त्या आजाराला कंटाळून मुख्यमंत्री पद सोडू इच्छित होत्या. पण 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणादरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितींमुळे त्यांनी आपला विचार बदलला.


  शीला दीक्षित यांनी त्यांची ऑटोबायोग्राफी 'सिटीझन दिल्ली: माय टाइम, माय लाईफ' मध्ये लिहिले होते की, मी स्वतःच्या आरोग्याची काळजी करणे गरजेचे असल्याचे माझ्या कुटुंबीयांनी मला सांगितले. त्यावेळी मी राजीनामा देण्याचे ठरवले होते. विधानसभा निवडणुकीसाठी एक वर्ष बाकी होते. माझा पर्याय शोधण्यासाठी पक्षाकडे बराच वेळ होता.


  निर्भया प्रकरणावेळी राजीनामा देणे युद्धभूमी सोडण्यासारखे होते

  शीला दीक्षित मुख्यमंत्रीपद सोडण्याचा निर्णय हायमानला सांगण्याचा विचार करत असतानाच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत एक बसमध्ये युवतीसोबत झालेल्या अत्याचाराची घटना समोर आली. दीक्षित यांच्यामते, निर्भया प्रकरणानंतर मी तणावात होते. त्यावेळी माझ्या परिवाराने माझी अवस्था पाहिली होती. ते म्हणाले की, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मी पदभार सोडवा. मला वाटले अशा परिस्थित पदभार सोडणे म्हणजे युद्धभूमी सोडण्यासारखे होते. केंद्र सरकारला या घटनेची जबाबदारी स्वतःवर घ्यायची नव्हती. निर्भया प्रकरणात विरोधी पक्ष माझ्या सरकारवर थेट आरोप लावणार हे मला माहित होते. कोणाला तरी याची जबाबदारी घ्यावी लागणार होती. यामुळे मी ती जबाबदारी माझ्यावर घेण्याचा निर्णय घेतला. या घटनेने शीला दीक्षित यांचे मन बदलले होते.
  त्यांनी लिहिले की, त्यावेळी मी तात्काळ प्रशासकीय अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणाबाबत सक्तीने चौकशी करण्यास सांगितले. पण नंतर शीला दीक्षित जंतर-मंतरवर लोकांद्वारे घटनेच्या विरोधात केलेल्या कँडल मोर्चा आणि विरोध प्रदर्शनास सहभागी झाल्या होत्या.


  शीला दीक्षित यांना पसंत होते वेस्टर्न संगीत
  शीला दीक्षित यांना युवावस्थापासूनच वेस्टर्न संगीताची आवड होती. आपल्या आवडीचे गाणे ऐकण्यसाठी रेडिओजवळ बसून वाट पाहत असत. त्यांना फुटवेअरचा देखील शोक होता. त्यांच्याकडे फुटवेअरचे चांगले कलेक्शन होते. आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये त्यांना या गोष्टींचा उल्लेख केला आहे. याशिवाय त्यांना वाचनाची आणि चित्रपट पाहण्याची आवड होती. हॅमलेट ब्लॅक अॅण्ड व्हाइट त्यांचा सर्वात आवडता चित्रपट होता.

Trending