आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर येथे प्रवाशांनी भरलेल्या दोन वाहनांवर उलटला भरधाव ट्रक; 16 जणांचा जागीच मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर येथे मंगळवारी सकाळी एक ट्रक टेम्पोला धडक देत रस्त्याच्याकडेला असलेल्या जीपवर पलटला. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगीनाथ यांनी दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक भरपाई देण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

टेम्पोला वाचवण्याच्या प्रयत्नात घडला अपघात
प्रत्यक्षदर्शिंनींच्या मते, लखनऊ-दिल्ली महामार्गावर सकाळी 10 वाजता एक भरधाव ट्रक अचानक समोरुन येणाऱ्या टेम्पोला धडकला. ट्रक चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला पण ट्रक टेम्पोला धडक देत रस्त्याच्याकडेला प्रवाशांनी भरलेल्या दुसऱ्या एका वाहनावर पलटला. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...