आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार-युपीचे लोकांना 13 रुपयांनी स्वस्त मिळतेय पेट्रोल, गाड्यांबरोबरच गॅलनमध्येही नेताहेत भरून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - पेट्रोलचे दर रोज वाढत आहेत आणि त्यामुळे सामान्य नागरिक अक्षरशः मेताकुटीला आला आहे. मुंबईसह अनेक शहरांत पेट्रोलने 90 चा आकडा ओलांडला आहे. दिल्लीतही पेट्रोल की कीमत 82 रुपए प्रति लीटरपेक्षा जास्त महागले आहे. पण बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांत लोक फक्त 69 रुपये प्रति लीटरने गाड्यांमध्ये पेट्रोल भरत आहेत. त्याचबोरबर हे लोक मोठमोठ्या गॅलनही भरून घेऊन जात आहेत. हा प्रकार सुरू आहे नेपाळ बॉर्डरला लागून अशलेल्या बिहार आणि उत्तर प्रदेशच्या भागामध्ये. 


बिहार आणि उत्तर प्रदेशचा काही भाग नेपाळ बॉर्डरला लागून आहे. त्याठिकाणाहून नेपाळमध्ये पायीदेखिल जाता येते. त्यामुळेच या लोकांनी भारतात पेट्रोल भरणे बंद केले आहे. ते यासाठी नेपाळमध्ये जातात. नेपाळला जाण्यासाठी पासपोर्ट किंवा व्हिसाची गरज नसते. तसेच सीमेवरही फार कडक वातावरण नसते. त्यामुळे लोकांना सहज पेट्रोल मिळते. 

 
कुठून होतेय तस्करी 
सुत्रांच्या माहितीनुसार बिहारच्या रक्सौलला लागून असलेल्या ग्रामीण भागांतून डिझेल आणि पेट्रोलची तस्करी केली जात आहे. यामुळेच सध्या नेपाळमध्ये पेट्रोलची मागणी वाढली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, नेपाळला पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा भारताकडूनच केला जातो. सुत्रांच्या मते, सीमाभागातील सहदेवा, महदेवा, अहिरवा टोला, पंटोका, सिसवा, मटिअरवा, महुआवा, कौरेया आदि ग्रामीण भागांतून बिनधास्तपणे डिझेल-पेट्रोलची तस्करी होत आहे. 


पुढे वाचा, कशी होत आहे तस्करी.. 

 

बातम्या आणखी आहेत...