आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Up Council Chairman Ramesh Yadav Son Abhijeet Yadav Murder Case Mother Meera Yadav Again Change Her Statement

Murder Mystery: 4 तासांतच आरोपी आईने फिरवला जबाब, म्हणाली- मी मुलाची हत्या केली नाही, त्याने स्वत:च फाशी घेतली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये हायप्रोफाइल मर्डर केसमुळे खळबळ उडाली आहे. ही केस एवढी गुंतागुंतीची होत आहे की, काही तासांतच पूर्णपणे केस उलटली. उत्तर प्रदेश विधान परिषदचे सभापती रमेश यादव यांचा मुलगा अभिजीत यादवचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला होता.

 

सोमवारी सकाळी मीरा यादवने पोलिसांसमोर कबूल केले होते की, तिनेच आपल्या ओढणीने मुलाचा गळा दाबून त्याची हत्या केली आहे. परंतु काही तासांतच जेव्हा तिला कोर्टापुढे हजर करण्यात आले, तेव्हा तिने लगेच जबाब फिरवला.

 

कोर्टात ती म्हणाली की, मी माझ्या मुलाचा गळा नाही दाबला, तर त्यानेच फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. तथापि, याप्रकारे सातत्याने आरोपी आई मीरा यादव जबाब बदलत असल्याने या केसची गुंतागुंत वाढत चालली आहे.

 

सकाळी काय दिला होता जबाब....
आज सकाळी अभिजित यादवची आई मीराने पोलिस चौकशीत कबूल केले होते की, त्यांनीच आपल्या मुलाची गळा आवळून हत्या केली. मीराने सांगितले होते की, अभिजित जेव्हा नशेत होता, तो त्यांच्याशी उद्धटपणे वागत होता आणि त्याने त्यांना मारण्याचाही प्रयत्न केला.
मीरा यादवने सांगितले की, त्यांनी आपला बचाव करण्यासाठी अभिजीतला मारले. यानंतर आपल्या 'ओढणी'ने त्याचा गळा आवळला. मीरा यादवने पोलिसांना सांगितले होते की, अभिजीतला मारल्यानंतर त्यांनी आपली ओढणी जाळून टाकली होती.

 

वास्तविक, अभिषेक यादवच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मीरा यादव यांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी तब्बल 9 तास मीरा यादव यांची चौकशी केली होती. या चौकशीत मीरा यादवने आपल्यावरील सर्व आरोप कबूल केले होते. परंतु काही तासांनीच जेव्हा कोर्टापुढे हजर करण्यात आले तेव्हा मात्र त्यांनी आपला जबाब फिरवला.

 

रमेश यादवची दुसरी पत्नी आहे मीरा
मीरा यादव विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांची दुसरी पत्नी आहे. पहिली पत्नी यूपीच्या एटामध्ये कुटुंबासोबत राहते. ज्या फ्लॅटमध्ये ही घटना झाली तो रमेश यादव यांचाच आहे. येथे मीरा यादव, अभिषेक यादव (मोठा मुलगा) आणि अभिजित यादव राहत होते. हत्येच्या वेळी फ्लॅटमध्ये आणखीही कोणी होते का, याचा पोलिस शोध घेत आहेत.

 

पोस्टमॉर्टममधून झाला होता खुलासा
या हत्येबाबत बोलताना एसपी ईस्ट सर्वेश मिश्रा म्हणाले की, आम्ही 21 ऑक्टोबर रोजी अभिजित यादव यांचा मृतदेह दारूल शफामधून ताब्यात घेतला. आधी तर या कुटुंबाने याला नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगितले. परंतु आम्हाला संशय आला. पोस्टमार्टमनंतर हे स्पष्ट झाले की, हा नैसर्गिक मृत्यू नव्हता, तर गळा दाबून करण्यात आलेली हत्या होती.

 

मोठ्या भावाने नोंदवली होती तक्रार
याप्रकरणी अभिजितचा मोठा भाऊ अभिषेकनेच पोलिसांत तक्रार नोंदवली होती. अभिषेकनेच आपल्या आईविरुद्ध 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...  

 

 

बातम्या आणखी आहेत...