आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Up Police Trolled For Making Weird Firing Sounds When Pistols Fail In An Encounter

Encounter करण्यासाठी गेले यूपीचे पोलिस जवान, बंदूकाच चालल्या नाही; मग तोंडानेच काढला फायरिंगचा आवाज...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संभल - उत्तर प्रदेश पोलिसांचा एक असा कारनामा उघडकीस आला की त्यावर हसावे की रडावे असा प्रश्न आता लोकांना पडला आहे. संभल जिल्ह्यात अट्टल गुन्हेगारांचा एनकाउंटर करण्यासाठी शुक्रवारी यूपी पोलिसांचे एक विशेष पथक पोहोचले होते. समोर गुंड थांबले होते, शूट करणार होते, की तेवढ्यात ऐनवेळी पिस्तुलने दगा दिला. मग, पोलिसांनी जी शक्कल लढवली ते ऐकल्यानंतर लोकांना हसून-हसून पोटदुखी होत आहे. एक अधिकारी बिनकामाची पिस्तुल हवेत नेम धरून थांबले आणि त्यांच्या शेजारी थांबलेला जवान आपल्या तोंडाने ठाय-ठाय आवाज काढत होता. जेणेकरून गुंडांना खरोखर एनकाउंट होत असल्याचा भास व्हावा. सोशल मीडियावर यूपी पोलिसांचा हा प्रताप प्रचंड व्हायरल होत आहे. लोक पोलिसांचा हा फोटो पोस्ट करून ट्रोल करत आहेत. 

 
ऐनवेळी पिस्तुलांनी दिला दगा...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असमोली पोलिस स्टेशनचे प्रभारी शुक्रवारी रात्री उशीरा वाहनांची चेकिंग करत होते. त्याचवेळी एका भरधाव कारमध्ये आलेल्या गुंडांनी बॅरिअर तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसांनी त्यांचा एनकाउंटर करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांनी गुंडांना इशारा देऊन फायरिंग केली. परंतु, ऐनवेळी दोन पोलिस जवानांच्या पिस्तुल चालल्याच नाही. पुन्हा प्रयत्न केला तरी काहीच झाले नाही. 

 

#WATCH: Police personnel shouts 'thain thain' to scare criminals during an encounter in Sambhal after his revolver got jammed. ASP says, 'words like 'maaro & ghero' are said to create mental pressure on criminals. Cartridges being stuck in revolver is a technical fault'. (12.10) pic.twitter.com/NKyEnPZukh

— ANI UP (@ANINewsUP) October 13, 2018

पोलिस जखमी, एकास अटक
दरम्यान पोलिसांनी त्यापैकी एका गुंडाला अटक केल्याचा दावा केला. बॅरिकेड तोडून जाण्याचा प्रयत्न करणारे गुंड हत्या आणि लूट प्रकरणातील आरोपी होते. त्याचे इतर सहकारी अंधाराचा गैरफायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले असेही पोलिसांनी सांगितले. पकडण्यात आलेल्या आरोपीकडून एक देसी कट्टा आणि 5 जिवंत काडतूसा जप्त करण्यात आल्या आहेत. सोबतच, यावेळी झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...