आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Up To 2025 10 Lakh Cyber Security Professionals Will Be Created; Demand For IoT, Cloud And Blockchain

२०२५ पर्यंत १० लाख सायबर सिक्युरिटी व्यावसायिक तयार होतील; आयओटी, क्लाऊड व ब्लॉकचेनची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्विकहीलच्या मुख्य मनुष्यबळ विकास अधिकाऱ्यांनी सांगितल्या सायबर सुरक्षा क्षेत्रातील संधी
  • या क्षेत्रात टॅलेंटची कमतरता, त्यामुळे जास्त संधी आहेत

कुलदीप सिंगोरिया 

नवी दिल्ली - भविष्यात सायबर सुरक्षेशी संबंधित मशीन लर्निंग, आयओटी, डेटा सिक्युरिटी आदींमध्येही रोजगार असतील. नोकरीच्या संधीवरून क्विकहील टेक्नॉलॉजीच्या मुख्य मनुष्यबळ अधिकारी रितू रैना यांच्याशी भास्करने चर्चा केली.> तुमच्या कंपनीत विविध पदांसाठी उमेदवाराची पात्रता काय?

तंत्रज्ञान कंपनी असल्याने आमची बहुतांश गरज संबंधित डोमेनसारख्या आयटी आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियंता पदवीधर असतात. अनुभवी व्यावसायिकांवर भर देतो.

> फ्रेशर्स, अनुभवी व्यावसायिकांसाठी कोणत्या संधी आहेत?

कोणत्याही अन्य क्षेत्रांप्रमाणे सायबर सिक्युरिटी कंपन्याही स्पेशलाइज्ड फ्रेशर्सची भरती करतात. उदाहरणार्थ कॉम्प्युटर किंवा आयटी अभियंता. त्यांना आमच्या संशोधन आणि विकास टीमसोबत प्रशिक्षित करण्यासोबत त्यांची आवड आणि पात्रतेच्या आधारावर प्रकल्प देतो. लॅटरल हायरिंगसाठी आम्हाला असे लोक हवेत ज्यांनी सी, सी++, विंडाेज कर्नल, मालवेअर अॅनालिसिस, आॅटाेमेशन आणि डेटा सायन्समध्ये काम केलेले असावे.> मुलाखतीची तयारी कशी करावीॽ

ज्यांच्यात स्वत:हून काही करण्याची धमक आहे, अशांना आम्ही प्राधान्य देताे. मुलाखतीदरम्यान पॅशन आणि वृद्धीसाठी उत्साह दिसत असेल तर त्याला प्राधान्य मिळते. तांत्रिक कामासाठी अनुभवाला प्राधान्य देताे.

> कंपनीत सर्वात जास्त नाेकऱ्या काेणत्या विभागात आहेतॽ

नव्या िनयुक्त्यांत आमचा भर नवाेन्मेष, आयपी आणि संशाेधन आणि विकासवर असताे. वाढीसाठी सेल्स विभागातही नियुक्त्या करताे.

> कंपनी प्रवेश प्रक्रिया कशी आहेॽ

कॅम्पस भरतीतून नव पदवीधारकांची भरती करताे. उमेदवार आमच्या करिअर पेजच्या माध्यमातून संपर्क साधू शकतात.

> तुमच्या कंपनीत कर्मचाऱ्याची एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली हाेते काॽ

लॅटरल ट्रान्झिसन आमचा टॅलेंट पूल चांगला करण्यासाठी आणि बहुमुखी प्रतिभेचे लीडर व व्यावसायिक तयार करण्यात मदत मिळाली आहे.> कर्मचाऱ्यांतील उद्यमशीलतेला प्राेत्साहन देता काॽ

संस्थेच्या कहाणी एक उद्याेजकाची कहाणी आहे. त्यामुळे संस्था म्हणून नव्या व जुन्या कर्मचाऱ्यांना एक समान संधी उपलब्ध करताे. यामुळे सर्वात विकास, नवाेन्मेष आणि उद्याेजकतेला प्राेत्साहन मिळते.

२०२२ पर्यंत ३०५ कोटी डॉलरचा बाजार 
> नॅसकाॅमच्या अहवालानुसार, भारतात २०२५ पर्यंत १० लाख कुशल सायबर सुरक्षा व्यावसायिक हाेतील. 

> डेटा सिक्युरिटी काैन्सिल आॅफ इंडियाच्या अहवालानुसार, भारतात सायबर सुरक्षेचा बाजार २०१९ मध्ये १.९७ अब्ज डाॅलरचा हाेता.

> २०२२ पर्यंत सायबर सिक्युरिटीची बाजारपेठ वाढून ३.०५ अब्ज डाॅलर होईल. 

> भारतात सायबर सिक्युरिटी बाजार १५.६ टक्के दराने वाढत आहे. राेजगाराच्या संधी


क्वालिटी अॅशुरन्स मॅनेजर


सिक्युरिटी लॅब्ज इन्चार्ज


प्राॅडक्ट मॅनेजर


आयओटी टेक्निशियन सपाेर्ट मॅनेजर


डेव्हलपमेंट इंजिनिअर.

बातम्या आणखी आहेत...