आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्ट्रीमिंग कंटेंटवर 7 लाख काेटींची उधळण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनाेरंजन उद्याेगात पाच वर्षांत नवे करार आणि कार्यक्रमांवर ४६ लाख काेटी रूपयांहून अधिक खर्च
  • स्ट्रीमिंग सेवेच्या वाढत्या स्पर्धेने अमेरिकेत कित्येक आर्थिक संधी निर्माण केल्या.
  • ग्राहकांना फायदा परंतु इंडस्ट्रीवर ३५ लाख काेटी रु. चा कर्जाचा बाेजा वाढला.

अमेरिकेत १८६० मध्ये रेल्वेतील गुंतवणुकीवर, १९४० मध्ये डेट्राॅइट कार उद्याेगात आणि या शतकात तेल, वायूच्या शाेधासाठी फ्रॅकिंग उद्याेगातील गुंतवणुकीवर भर दिला जात असे. मात्र आता स्टील, सिमेंटशिवाय स्क्रिप्ट, ध्वनी, स्क्रीन आणि सेलिब्रिटींशी संबंधित व्हिडिअाे स्ट्रीमिंगमधील गुंतवणुकीची धूम सुरू आहे. या आठवड्यात 'डिस्ने'ने स्ट्रीमिंग सेवा सुरू केली आहे. या उद्याेगातील अग्रणी 'नेटफ्लिक्स'च्या माॅडेलचे डझनावारी स्पर्धकांनी अनुकरण केले आहे. जगातील ७० काेटींहून अधिक लाेक स्ट्रीमिंग सेवेचे ग्राहक आहेत. यावर्षी स्ट्रीमिंग कंटेंटवर ७ लाख १८ हजार काेटी रुपये खर्च करण्यात आले. एकंदरीत मनाेरंजन उद्याेगाने गेल्या पाच वर्षांत कंपन्यांचे अधिग्रहण आणि कार्यक्रमांच्या निर्मितीवर ४६ लाख ६८ हजार काेटी रुपये खर्च केले आहेत. मनाेरंजन उद्याेग झपाट्याने विस्तारत चालला आहे. १९२० मध्ये ध्वनीचा उदय झाल्यापासून हाॅलीवूड जागतिक चित्रपट व्यवसायाचे केंद्र बनले. २० व्या शतकाच्या अखेरीपर्यंत आत्मकेंद्री राहिलेल्या चित्रपट उद्याेगास बसलेला पहिला धक्का १९९९ मध्ये संगीत क्षेत्राला जाणवला. इंटरनेट सेवांमुळे ईएमआय आणि वाॅर्नर म्युझिकसारख्या प्रस्थापित कंपन्यांवर प्रभाव जाणवला. २००७ मध्ये 'नेटफ्लिक्स'ने व्हिडिअाे सब्स्क्रिप्शन विकण्यासाठी ब्राॅडबँडचा वापर केला. स्मार्ट फाेनने या सेवा थेट लाेकांच्या हाती पाेहाेचवल्या. 'नेटफ्लिक्स'मुळे मनाेरंजन उद्याेगाचा चेहरा बदलला आहे. पटकथा लेखकांना पुन्हा चांगले दिवस आले. हाॅलीवूड स्टुडिअाेचे भाडे वधारले. विसाव्या शतकातील मीडियासम्राट मागे हटले. रुपर्ट मर्डाेकला मार्चमध्ये आपल्या साम्राज्याचा माेठा हिस्सा डिस्नेला विकणे भाग पडले. तेव्हापासून मनाेरंजन उद्याेगातील नव्या माॅडेलची रूपरेषा स्पष्ट झाली. टेलिव्हिजन आणि व्हिडिअो स्ट्रीमिंगमध्ये काेणत्याही फर्मचा बाजारपेठेतील वाटा २०% पेक्षा जास्त नाही. दावेदारांमध्ये नेटफ्लिक्स, डिस्ने, एटीअँडटी-टाइम वार्नर, कॉमकास्ट अन्य लहान कंपन्या आहेत. यूट्यूब, अॅमेझाॅन, अॅपल हेदेखील सक्रिय आहेत. संगीत उद्याेगातही माेठी उलाढाल हाेत असून अमेरिकन स्पाेटीफाई कंपनीचा सर्वाधिक ३४% मार्केट शेअर आहे. आता काेणतीही स्ट्रीमिंग सेवा एक हजार रुपयांत मिळते. यापूर्वी केबल टीव्हीसाठी साडेपाच हजार रुपये द्यावे लागत हाेते. गेल्या वर्षी ४९६ नवे शाे बनवण्यात आले. २०१०च्या तुलनेत ही संख्या दुप्पट झाली आहे. अर्थात, 'वायकाॅम'सह काही दिग्गज कंपन्यांना फटकादेखील बसला, तर अन्य काही कंपन्या लयास जाण्याची चिन्हे आहेत. नेटफ्लिक्स दरवर्षी २ लाख काेटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करीत आहे. गुंतवणूक आणि उत्पन्नाचा ताळमेळ साधण्यासाठी त्यास १५% सबस्क्रिप्शन वाढवावे लागेल. या व्यावसायिक स्पर्धेत ३० पेक्षाही अधिक कंपन्या असल्यामुळे तूर्त तशी शक्यता दिसत नाही. नवे अधिग्रहण आणि माेठ्या प्रमाणावरील खर्चामुळे अमेरिकी माध्यम कंपन्यांवर ३५ लाख काेटी रुपयांहून अधिक कर्जाचा बाेजा झाला आहे. लॉस एंजिलिस मध्ये सिनेमाकॉन २०१९ मध्ये डिस्ने अाणि फाॅक्स मुव्हीजचे सादरीकरण. १२ नाेव्हेंबर राेजी डिस्नेची स्ट्रीमिंग सर्विस- डिज्नी प्लस लॉन्च झाली आहे.

प्रेक्षकांना वेधण्यासाठी वाढली स्पर्धा
- डिस्नेची स्ट्रीमिंग सेवा अमेरिका, कॅनडा अाणि नेदरलँडमध्ये केवळ ५०० रुपयांत उपलब्ध. ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी फाॅक्सचे पाच लाख काेटी रुपयांत केले अधिग्रहण.
- वाॅर्नर मीडियाची मालकी असलेल्या 'एटीअँडटी'ने अाॅक्टाेबरमध्ये एचबीअाे मॅक्सची सुरुवात केली. १ नाेव्हेंबरपासून अॅपल टीव्ही प्लस लाँच झाला. सीबीएस, अॉल अॅक्सेस आणि शाे टाइम पूर्वीपासूनच मैदानात अाहेत.
- २०१० नंतर वाॅर्नर मीडिया, डिस्ने आणि नेटफ्लिक्स या तीन समूहांनी कार्यक्रमांवर १७ लाख काेटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे.
- नेटफ्लिक्सने काेणतीही कंपनी खरेदी केली नाही तरीही त्यावर ८६ हजार काेटींहून अधिक कर्ज आहे. यावर्षी त्याच्या अमेरिकन सब्सक्रायबरची संख्या १२ वर्षात पहिल्यांदाच घटली.