आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Upcoming : Ayushman Khurana Wakes Up At 4 O'clock Daily For Shooting Of His Upcoming Film 'Baala'

अपकमिंग : 'बाला'मध्ये टक्कल दिसण्यासाठी सकाळी ४ वाजता उठतो आयुष्मान, मेकअपसाठी लागतात अडीच तास 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आयुष्मान खुराणा आपल्या आगामी 'बाला' चित्रपटाच्या शूटिंगसाठी सकाळी चार वाजता उठतो. टक्कल असलेली व्यक्ती साकारणयासाठी तो आपल्या साखरझाेपेची कुर्बानी देत आहे. खरं तर आयुष्मान या चित्रपटात एका टक्कल पडलेल्या व्यक्तीचे पात्र साकारत आहे. या मेकअपसाठी त्याला अडीच ते तीन तास लागतात, त्यामुळे तो शूटिंगच्या वेळेच्या आधीच तयार होऊन बसतो, नंतर मेकअप सुरू होतो. 2.5 तास लागतात रोज बालाच्या मेकपअसाठी 10 स्टेपमध्ये पूर्ण होतो स्कल मेकअप. 

 

पुढे करावे लागेल टक्क्ल...  
आयुष्मानच्या शब्दांत...'बालासाठी अजून केस काढले नाहीत. सध्या या मेकअपने काम चालवत आहे, मात्र पुढे टक्कल करावे लागेल. कथेत वेगवेगळे वळण आहेत. आताच केस काढले तर पुढचे शॉट करू शकणार नाही. त्यामुळे मी स्कल कॅप घालून बाल्ड मेकअप करत आहे. अशा प्रकारे विनाकेसांचा मेकअप करून येण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्या गेटअपमध्ये येण्यासाठी मला अडीच तास लागतात. त्यामुळे इतक्या सकाळी उठावे लागते. खरे सांगायचे झाले तर सध्या झोपच होत नाहीये. 

 

आयुष्मान खुराणाने सध्या केस काढले नाहीत म्हणून त्याच्या डोक्यावर स्कल कॅप लावला आहे. त्या कामामध्ये दोन ते तीन तास लागतात. बाल्ड कॅप केसच्या वर लावला जातो आणि चारही बाजूने चिकटवले जाते. असाच मेकअप आम्ही १०२ नॉटआऊटमध्ये अमिताभ बच्चनचा केला होता. त्यांच्या केसानाही कॅप लावली होती त्यावरून पांढरे केस लावले होते.- दीपक सावंत, मेकअप आर्टिस्ट

 

अशी असते या मेकअपची प्रक्रिया...  
1 जेलने केसांना चोपून चोपून बसवले जाते
2 अनट्रिम्ड स्कल कॅप डोक्याला जशीच्या तशी बसवली जाते. 
3 पेन्सिलने नैसर्गिक रिंकल्स आऊटलाइन केली जाते. 
4 हेअरलाइनवर आधी स्प्रिट गम नंतर कोटिंगने दोन्ही कोपरे पॅक केले जातात. 
5 काही काळानंतर स्कल कॅपवर एसटोनने ब्रशिंग केले जाते. 
6 डोक्यातील केस दिसू नयेत यासाठी लिक्विड लॅटेक्सचा वापर करण्यात येतो. 
7 पफने पारदर्शी पावडर स्कल कॅपवर लावले जाते. पावडरने शेड मॅच केलेे जाते.  
8 रबर मास्क ग्रीसचा वापर टक्कल पडलेल्या भागासाठी केला जातो. यामुळे ते चमकते. 
9 सर्वात शेवटच्या लूकसाठी फाउंडेशनचा वापर केला जातो. 
10 डोक्याच्या साइडचे केस दाखवण्यासाठी केसांना स्प्रिट गमच्या मदतीने चिकटवले जाते. त्यानंतर कर्ली केले जाते. 

 

चित्रपटाचे मुंबईचे शेड्यूल पूर्ण झाले. आयुष्मान आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर पुढील शूटिंगसाठी या महिन्याच्या २५ तारखेला कानपूरला जातील. 

बातम्या आणखी आहेत...