आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉन अब्राहमचा \'पागलपंती\' आणि अर्जुन कपूरच्या \'पानिपत\'मध्ये होणार टक्कर, यावर्षी या चित्रपटांमध्ये होणार क्लॅश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. जॉन अब्राहमचा चित्रपट 'पागलपंती' या वर्षी 6 डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. याच दिवशी आशुतोष गोवारीकर आपला इतिहासावर आधारित चित्रपट 'पानिपत' प्रदर्शित करणार आहेत. जॉन अब्राहम आणि इलियाना अभिनीत चित्रपट 'पागलपंती' नुकताच त्यातील कलावंतांबाबत प्रकाशझोतात आला आहे. सुरुवातीला या चित्रपटामध्ये अजय देवगण काम करू शकतो, अशी चर्चा होती. मात्र, नंतर तो यात काम करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. पुढील महिन्यात याची शूटिंग सुरू होईल. दुसरीकडे आशुतोष गोवारिकरदेखील बऱ्याच दिवसांपासून आपला आगामी इतिहासावर आधारित चित्रपट 'पानीपत'वर काम करत आहेत. या चित्रपटातही कलावंतांचा अधिक भरणा आहे. 'पागलपंती'मध्ये जॉन आणि इलियानाशिवाय अनिल कपूर, कृती खरबंदा, अरशद वारसी, पुलकित सम्राट आणि उर्वशी रौतेला हे कलावंत आहेत, तर 'पानीपत'मध्ये संजय दत्त, रेखा, अर्जुन कपूर, कृती सेनन, पद्मिनी कोलाहपुरे, मोहनीश बहल इत्यादी मोठे कलाकार आहेत.  

 

आशुतोष आपल्या चित्रपटासाठी कर्जतमधील एनडी स्टूडिओत एक भव्य सेटही बनवला आहे. हा सेट नितिन चंद्रकांत देसाई यांनी तयार केला आहे. या चित्रपटासाठी अर्जुनने टक्कलही केले आहे. याची शूटिंग सुरू झाली आहे. कृती आणि संजयनेही नुकतीच शूटिंग सुरू केली आहे. या चित्रपटात संजयदेखील बाल्ड लुकमध्ये दिसेल. सध्या टीमचे सदस्य कृती आणि अर्जुनसोबत शूटिंग करत आहेत. चित्रपटात मराठा योद्ध्याची भूमिका साकारण्यासाठी अर्जुन आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनवरही काम करत आहे. तसेच तो घोडेस्वारीही शिकत आहे. कृतीदेखील चित्रपटा आपल्या भूमिकेसाठी घोडेस्वारी शिकत आहे. 

 

दोन्ही चित्रपटांचे विषय वेगवेगळे आहेत. दोन्हींचा प्रेक्षक वर्गही वेगळा आहे. असे असतानाही बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांची टक्कर पाहायला मिळू शकते. एखाद्या मोठ्या चित्रपटाला टक्कर देणारा जॉनचा हा या वर्षीचा पहिलाच चित्रपट नाही. याशिवाय त्याचा दुसरा चित्रपट 'बाटला हाउस'देखील याच वर्षी स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमारच्या 'मिशन मंगल'सोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. 

 

या चित्रपटांत होणार टक्कर 
- मणिकर्णिका VS ठाकरे 
25 जानेवारीला 'मणिकर्णिका' आणि 'बाळ ठाकरे'मध्ये होईल क्लॅश 

- मेड इन चायना VS छिछोरे 
30 ऑगस्टला 'मेड इन चायना' आणि 'छिछोरे' यांच्यात टक्कर 

- हृतिकचा चित्रपट VS मरजावां 
2 ऑक्टोबरला हृतिक व टायगरचा चित्रपट आणि 'मरजावां'मध्ये टक्कर 

- ब्रह्मास्त्र VS किक-2
ख्रिसमसला 'किक-2' आणि 'ब्रह्मास्त्र' यांच्यात होईल टक्कर 

 

बातम्या आणखी आहेत...