आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भूल भुलैया -2' मध्ये काम करु शकतो अक्षय कुमार, कार्तिक आर्यन असणार मुख्य भूमिकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - अक्षय कुमारचा 'भूल भुलैया' एक मळ्यालम चित्रपटाचा रिमेक होता. 2007 मध्ये आलेला 'भूल भुलैया' सुपर हिट ठरला होता. आता 12 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वल तयार करण्यात येणार आहे. हा सिनेमा 'भूल भुलैया 2' अशा नावाचे चित्रपटाची निर्मिती होत आहे. सीक्वलमध्ये कार्तिक आर्यन डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मुख्य अभिनेत्रीसाठी जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांच्या नावाची चर्चा आहे. पहिल्या भागात अक्षय कुमारने डॉक्टरची भूमिका साकारली होती. तर दुसऱ्या भागातही अक्षयला एका विशेष रोलसाठी अप्रोच करण्यात आले आहे. 

 

कॅमियो रोलपेक्षा मोठा असेल अक्षयचा रोल
सुत्रांच्या मते, कार्तिक चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणार आहे. अक्षय देखील चित्रपटाचा भाग व्हावा असे मेकर्सना वाटत आहे. कारण पहिल्या भागात अक्षयच्या भूमिकेचे चांगले कौतुक करण्यात आले होते. अक्षयला जी भूमिका ऑफर करण्यात आली आहे ती कॅमियो पेक्षा मोठी आणि महत्वाची आहे. असे असले तरी अक्षयने मात्र अद्याप होकार दिला नाही. 

 

मोगुलमुळे अक्षय आणि भूषण यांच्या वाद 
भूषण कुमार या चित्रपटाची निर्मिती करत आहे. अक्षय आणि भूषण यांच्या 'मोगुल' चित्रपटामुळे वाद सुरु आहे. मोगुलच्या कथेवरून दोघांत वाद झाले आणि अक्षयने या चित्रपटातून माघार घेतली. एका अभिनेता स्वतः विधान करत या गोष्टीचा खुलासा केला होता की तो गुलशन कुमार यांच्यावर बनत असलेल्या बायोपिकमध्ये काम करणार नाही.  

 

विद्यापूर्वी ऐश्वर्या आणि कॅटरीनाला दिली होती चित्रपटाची ऑफर
दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी 'भूल भुलैया' दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त विद्या बालन, आमीषा पटेल, शायनी आहुजा, परेश रावल, मनोज जोशी यांसारखे दिग्गज कलाकार होते. त्यावेळी विद्याअगोदर या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय, कॅटरीना कॅफ यांसारख्या अभिनेत्रींचा विचार करण्यात आला होता.