Home | Sports | From The Field | India lost first test Against England

Ind vs Eng Test : पहिल्या कसोटीत इंग्लंडचा भारतावर 31 धावांनी विजय, विराटचे अर्धशतक व्यर्थ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 04, 2018, 05:15 PM IST

विराटने पहिल्या डावातील शतकानंतर दुसऱ्या डावातही महत्त्वाचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने 89 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

 • India lost first test Against England
  बर्मिंघम - इंग्लंडमधील कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 31 धावांनी पराभव केला आहे. भारत सामना जिंकणार अशा आशा असतानाच कर्णधार विराट कोहली बाद झाला आणि भारताचे कंबरडे मोडले. त्यानंतर कोणाचाही इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर टिकाव लागला नाही. पांड्याने झुंज देण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही साथ मिळाली नाही. त्यामुळे मालिकेत या विजयासह 1-0 ने आघाडी घेतली आहे.
  चौथ्या दिवसाचा खेळ
  >> भारतासाठी खेळाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. दिवसाची सुरुवात कार्तिकच्या विकेटने झाली.
  >> कार्तिकला अँडरसनने बाद केले.
  >> कार्तिक बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिकने विराटला चांगली साथ दिली.
  >> विराटने पहिल्या डावातील शतकानंतर दुसऱ्या डावातही महत्त्वाचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने 89 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
  >> अर्धशतकानंतर विराट फार वेळ मैदानावर टिकला नाही. बेन स्टोक्सने त्याला पायचित केले.
  >> त्यानंतर मोहम्मद शमीही त्याच ओव्हरमध्ये आल्या पावली परतला.
  >> इशांत शर्माने काही चांगले फटके मारले पण तोही फार काळ मैदानावर टिकला नाही.
  >> हार्दीकने काही वेळ एकाकी लढा देण्याचा प्रयत्न केला पण स्टोक्सने त्याला बाद करत विजय साकारला.
  >> इंग्लंडच्या बेन स्टोक्सने दुसऱ्या डावात भारताचे चार फलंदाज तंबूत परत पाठवले.

 • India lost first test Against England
 • India lost first test Against England

Trending