• Home
  • uphold grooms sister marriage tribal tradition in gujarat

Gujarat / अचंबित करणारी आहे येथील परंपरा : स्वतःच्याच लग्नात सहभागी नाही होऊ शकत नवरदेव; बहीण घेते वधूसोबत सप्तपदी

असे जर नाही केले तर करावा लागतो अडचणींचा सामना
 

दिव्य मराठी वेब टीम

May 26,2019 05:40:00 PM IST

गुजरात : गुजरातमधील उदयपूर शहरातील आदिवासियांमध्ये लग्नाची एक विचित्र प्रथा आहे. येथे होणाऱ्या लग्नात नवरदेवचा सहभाग नसतो. गावकऱ्यांच्या नियमानुसार लग्नात नवरदेवाऐवजी त्याची अविवाहित बहीण किंवा त्याचा कुटुंबातील दुसरी एखादी अविवाहित महिला त्याचे प्रतिनिधित्व करते. नवरदेव आपल्या आईसोबत घरीच थांबतो. तर नवरदेवाची बहीम वधूकडे वऱ्हाड घेऊन जाते आणि तिच्यासोबत लग्न करते. बहीणच वधूसोबत सप्तपदी करते आणि तिला आपल्या घरी आणते. एएनआयच्या मते, सुरखेड़ा गावातील कानजीभाई राथवाने सांगितले की, 'लग्नातील सर्व विधी नवरदेवाच्या बहीणकडून पूर्ण करण्यात येतात. नवरदेवाची बहीणच सप्तपदी घेते. ही प्रथा तीन गावांत आहे. ही प्रथा पार नाही पाडली तर अडचणींचा सामना करावा लागतो. असे या गावातील लोकांचे म्हणणे आहे.'


गावचे सरपंच रामसिंहभाई राथवाने सांगितले की, 'अनेकांनी ही प्रथा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. पण नंतर त्याच्यासोबत वाईट घटना घडल्या. एक तर त्यांचे लग्न मोडले नाहीतर त्यांच्या घरातील अडचणी वाढल्या.' आश्चर्याची गोष्ट म्हणजे, नवरदेव शेरवानी परिधान करू शकतो. पण स्वतःच्याच लग्नात सहभागी होऊ शकत नाही. ही परंपरा सुरखेडा, सनाडा आणि अंबल या गावांनी स्वीकारली आहे.

X
COMMENT