Home | National | Gujarat | uploading private photographs on the internet with smart TV hacking

गुजरात : स्मार्ट टीव्ही हॅक करून खासगी छायाचित्रे इंटरनेटवर अपलोड

वृत्तसंस्था, | Update - Jul 10, 2019, 11:28 AM IST

हॅकर्सनी जोडप्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी बिटकॉइनची केली होती मागणी

  • uploading private photographs on the internet with smart TV hacking

    सूरत - गुजरातमधील सुरतमध्ये स्मार्ट टीव्हीद्वारे गुप्तपणे बेडरूममधील खासगी छायाचित्रण होत असल्याच्या दोन दिवसांत दोन घटना उघडकीस आल्या. यात हॅकर्सनी कसलीही सिस्टिम न वापरता स्मार्ट टीव्हीने दांपत्याचा व्हिडिओ तयार केला. नंतर तो इंटरनेटवर व्हायरल केला. आपलाच व्हिडिओ पाहून या जोडप्यास धक्काच बसला. त्यांनी सायबर क्राइम शाखेत तक्रार दिली. सायबर क्राइमचे पोलिस निरीक्षक जे.बी. आहिर यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. सायबर एक्सपर्ट डॉ. चिंतन पाठक यांनी सांगितले, हॅकर्सनी जोडप्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी बिटकॉइनची मागणी केली होती. परंतु मी ई-मेल केल्यानंतर त्यांनी ब्लॅकमेल करणे बंद केले.


    अन्य एक सायबर एक्सपर्ट स्नेहल वकील म्हणाल्या, स्मार्ट टीव्ही इंटरनेट कनेक्शनवर चालतो. हॅकर्स टीव्हीचे सॉफ्टवेअर अॅक्सेस करतात. जर एखादे अॅप टीव्हीमध्ये डाऊनलोड केले असेल तर त्याचे अॅक्सेस हॅकर्सकडे असतात. टीव्ही जेव्हा इंटरनेटवर चालतो, तेव्हा हॅकर्स फ्रंट कॅमेऱ्याच्या माध्यमातून व्हिडिओ अथवा छायाचित्रे घेऊ शकतो.

Trending