Home | Sports | From The Field | upul tharanga positive in dope test

विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेच्या खेळाडूने घेतलेले उत्तेजक द्रव

Agency | Update - May 29, 2011, 04:44 PM IST

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका संघाला झटका बसण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचा सलामीवीर उपुल थरंगाने विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान उत्तेजक द्रव घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

  • upul tharanga positive in dope test

    tharanaga_258कोलंबो - इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका संघाला झटका बसण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचा सलामीवीर उपुल थरंगाने विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान उत्तेजक द्रव घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची आयसीसीकडून चौकशी करण्यात येणार आहे.

    थरंगा प्रेडनिसोलोन हे औषध घेताना दोषी आढळला आहे. मात्र, संडे टाईम्स या वृत्तपत्रात थरंगाने हे उत्तेजक द्रव डॉक्टरांनी सांगितल्यामुळे घेतल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. आयसीसी या प्रकरणाची लवकरच चौकशी सुरु करणार असून, विश्वकरंडकावेळी त्याच्या रक्ताचे नमुने पॉझिटिव्ह आले होते. विश्वकरंडक स्पर्धेत थरंगाने इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात शतक झळकाविले होते. श्रीलंका विश्वकरंडकात उपविजेती राहिली होती. तेव्हा अहवाल पॉझिटिव्ह सापडल्यानंतर थरंगाने आपण सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर आणि आशिष नेहरा यांच्यावर इलाज करणाऱ्या डॉक्टरांकडून उपाय करून घेतल्याचे म्हटले होते.Trending