आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराच्या छतावर किंवा बाल्कनीत करा ही अत्याधुनिक प्रकारची शेती; महिन्याला कमवा लाखो रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मागील काही वर्षांपासून देशात अर्बन फार्मिंग कल्पना विकसित होत आहे. अर्बन फार्मिंगचा अर्थ शहरात इमारंतींवर किंवा बाल्कनीत केली जाणारी शेती. आता या अत्याधुनिक तंत्राचा वापर करुन तुम्हीही जैविक पद्धतीने फळ-भाज्यांचे उत्पादन घेऊन त्याचा बिझनेससुद्धा करु शकता. त्यासाठी आता सरकारनेही निसबड या संस्थेच्या माध्यमातून लोकांना अर्बन फार्मिंगचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. आज आम्ही तुम्हाला याच प्रशिक्षणाबद्दल सांगणार आहोत. त्यासोबतच हे प्रशिक्षण घेताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात याविषयी माहिती देणार आहोत.   

 

ही आहे अर्बन फार्मिंग

अर्बन फार्मिंग चार प्रकारची असते.
> टेरेस फार्मिंग
> बाल्कनी फार्मिंग
> व्हर्टिकल फार्मिंग
> अॅक्वापोनिक्स फार्मिंग

 

कधी आहे प्रशिक्षण?

नोएडा शहरातील निसबड या सेंटरमध्ये 15 आणि 16 डिसेंबरला हे अत्याधुनिक फार्मिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निसबड, मिनिस्ट्री ऑफ स्किल, डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप अंतर्गत काम करणाऱ्या संस्थेकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

 

किती असेल फी?

या दोन दिवसाच्या ट्रेनिंगची फी 3000 रुपये असून त्याव्यतिरिक्त तुम्हाला 18 टक्के जीएसटी कर भरावा लागणार आहे.

 

कसे करणार रजिस्ट्रेशन?
तुम्हाला या दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेली लिंक उघडून तिथे फॉर्म भरणे बंधनकारक आहे.
 
 https://www.niesbud.nic.in/docs/2018-19/Programmes/December/edp-on-urban-farming-green-business-for-entrepreneurs-15-dec-niesbud.pdf 
 

 

पुढील स्लाइडवर पाहा- छतावर उगवू शकतात शेकडो किलोंचा भाजीपाला 

 

 

बातम्या आणखी आहेत...