आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Urban Indian Most Concerned About Unemployment, 69% Feel Country Is Going In A Right Way

शहरी भारतीय बेरोजगारीवरून सर्वाधिक चिंतित, 69 टक्क्यांना वाटते या देशाचे योग्य दिशेने मार्गक्रमण होतेय : सर्वेक्षण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अन्य देशांतील 62% लोकांनुसार, त्यांचा देश चुकीच्या ट्रॅकवर
  • जगाला कशाची चिंता वाटते' या विषयावर आयपीसोसने 28 देशांत ऑनलाइन पाहणी केली

​​​​​​​नवी दिल्ली : शहरातील भारतीयांसाठी बेरोजगारी सर्वात मोठा मुद्दा आहे. रिसर्च फर्म आयपीसोसच्या जगाला कशाची चिंता वाटते' या विषयावर केलेल्या सर्वेक्षणानुसार, ४६ टक्के शहरी भारतीय देशात बेरोजगारीवरून चिंतित आहेत. सर्वेक्षणानुसार, वित्तीय आणि राजकीय भ्रष्टाचार, गुन्हा आणि हिंसाचार, गरिबी आणि सामाजिक भेदभाव आणि हवामान बदलासारखे अन्य मुद्यांवरूनही भारतीय चिंतित आहेत.

सर्वेक्षणानुसार, जगात निराशावादाच्या विपरीत भारतात धोरणांवरून लोकांत आशादायक स्थिती आहे. सर्वेक्षणानुसार, जागतिक निराशा नाकारत ६९ % शहरी भारतीयांच्या म्हणण्यानुसार, देश योग्य दिशेने जात आहे. जगातील ६२ टक्के नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा देश चुकीच्या ट्रॅकवर जात आहे. ४६ टक्के शहरी भारतीयांनी सांगितले की, त्यांना सर्वात जास्त चिंता बेरोजगारीची आहे. हा अहवाल नोव्हेंबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या सर्वेक्षणात या वेळी ३ टक्क्यांहून जास्त लोकांना वाटते की, ते बेरोजगारीबाबत चिंतिंत आहेत. हे सर्वेक्षण आॅनलाइन पॅनल सिस्टिमच्या माध्यमातून जगातील २८ देशांत केले.
भारतीय, वित्तीय व राजकीय भ्रष्टाचार, गुन्हा, हिंसाचार व गरिबी तसेच असमानता, हवामान बदलावर चिंता व्यक्त करतात. सर्वेक्षणानुसार, ग्लोबल सिटिझन बेरोजगारीनंतर गरिबी आणि सामाजिक असमानतेवर सर्वात जास्त चिंता करतात. याशिवाय ग्लोबल सिटिझन गुन्हे व हिंसाचार, वित्तीय व राजकीय भ्रष्टाचारावरून चिंता व्यक्त करतात. ४५% नी सांगितले, २०१९ मध्ये महिला सुरक्षेत कोणतीच सुधारणा झाली नाही.

२९% लोकांना महिला सुरक्षेवर फोकस हवा वाटतो

शहरी भारतीयांमध्ये २९% लोकांना वाटते की, २०२० मध्ये सरकारला महिला सुरक्षेच्या मुद्यावर फोकस करावा,असे वाटते. २१ टक्क्यांना अर्थव्यवस्था व ११% रोजगाराला प्राधान्य द्यावे वाटते. सर्व्हेत १०११ भारतीयांना समाविष्ट केले. जगात पसरलेल्या युगो पॅनलच्या ८० लोकांनाही समाविष्ट केले आहे. ४३% पुरुष व ४८% महिला म्हणाल्या, महिला सुरक्षेच्या मुद्यावर वेगवेगळ्या वयोगटातील लोकांत वैचारिक अंतर आहे.