Home | Business | Industries | urea-production-in-india

१५.९६ लाख टन युरिया उत्पादित

वृत्तसंस्था | Update - May 20, 2011, 01:42 PM IST

एप्रिल महिन्यात देशात 15.96 लाख टन युरिया आणि 2.63 लाख टन डायअमोनियम फॉस्फेटचे (डीएपी) उत्पादन झाले.

  • urea-production-in-india

    नवी दिल्ली - एप्रिल महिन्यात देशात 15.96 लाख टन युरिया आणि 2.63 लाख टन डायअमोनियम फॉस्फेटचे (डीएपी) उत्पादन झाले. चालू वर्षातील एप्रिल महिन्यात, 3.65 लाख टन युरियाची आयात झाली; त्यापैकी 1.42 लाख टन ओमिफ्को, ओमान तर 2.22 लाख टन इतर स्रोतांकडून आयात करण्यात आला.

    एप्रिलमध्ये 0.30 लाख टन डीएपी तसेच 3.21 लाख टन एमओपीदेखील आयात करण्यात आले आहे. राज्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी देशात मुबलक फर्टिलायझर्स उपलब्ध आहेत. डीएपी, एमओपीची एप्रिलमधील उपलब्धता अनुक्रमे 2.31 लाख टन व 0.98 लाख टन होती. एप्रिलदरम्यान देशभरात 19.45 लाख टन युरिया उपलब्ध होता. त्यापैकी 15.85 लाख टन युरिया विविध राज्यांमध्ये पाठविण्यात आला आहे. चालू कृषीवर्षात युरिया वापरात 57 टक्क्यांची वाढ झाली.

Trending