Home | Maharashtra | Vidarva | Akola | Urgently recommend reservartion : MP Mahatme

समाजामध्ये फसवल्या गेल्याची भावना; तातडीने शिफारस करा : खासदार महात्मे

प्रतिनिधी | Update - Sep 03, 2018, 11:27 AM IST

धनगर अारक्षणावरुन समाजात फसवल्या गेल्याची भावना दिवसेंदिवस वाढत असल्याचे नमूद करीत अारक्षणासाठीची शिफारस राज्य सरकारने

 • Urgently recommend reservartion : MP Mahatme

  अकाेला- 'धनगर अारक्षणावरुन समाजात फसवल्या गेल्याची भावना दिवसेंदिवस वाढत असल्याचे नमूद करीत अारक्षणासाठीची शिफारस राज्य सरकारने तातडीने करावी,' अशी मागणी भाजपचे राज्यसभेचे खासदार विकास महात्मे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.


  धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (एसटी ) अारक्षण देऊन त्या प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी अनेक वर्षांपासून अांदाेलन सुरु अाहे. प्रत्येक जिल्ह्यात सभागृहासाठी जवळपास ५ लाख स्क्वेअर फूट जागा उपलब्ध हाेणार असून, अर्थसंकल्पात ४० काेटींची तरतूदही करण्यात अाली अाहे. ही रक्कम वाढवणे अावश्यक अाहे. अनेक दशकानंतर राज्यसभेत धनगर समाजाला स्थान देण्यात अाले असून, या ठिकाणी अारक्षणासह इतरही मुद्दे मांडत असल्याचे खा. महात्मे म्हणाले. त्यामुळे राजीनामा देण्यापेक्षा प्रश्न मांडणे, मुद्द्यांचा पाठपुरावा करणे अावश्यक असल्याचाही ते म्हणाले. राजीनामा देऊन मिळत अारक्षण मिळत असल्यास तेही करण्यास तयार अाहे, असेही त्यांनी एका प्रश्नांच्या उत्तरात स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष भास्कर पिलात्रे, माजी महापाैर तथा नगरसेविका सुमनताई गावंडे, विक्रम गावंडे, छाेटू गावंडे, प्रा. अनिल तिरकर, रणजित गावंडे, सूरज गावंडे अादी उपस्थित हाेते.


  दूहीचा प्रश्नच नाही
  आदिवासी अारक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला अारक्षण देता येईल, यासाठीचे पर्याय सरकारकडे उपलब्ध असल्याचा दावा खा. महात्मे यांनी केला. धनगर समाजाला एनटी-बीमध्ये समाविष्ट करता येईल. यापूर्वी सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांनी धनगर समाजाला अारक्षण का दिले नाही, असा सवाल उपस्थित करीत भाजपकडून प्रयत्न सुरु असल्याचेही ते खा. महात्मे यांनी नमूद केले.


  'टीस'चा अहवाल कसाही असाे
  धनगर समाजाच्या अारक्षणासाठी राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट अाॅफ साेशल सायंस (टीस) या संस्थेकडून अहवाल मागितला अाहे. मात्र या अहवालात काहीही नमूद असाे, अारक्षणाची पद्धती कशी साेडवावी, हे सरकारला माहीत असून, त्यांनी तातडीने अारक्षणाची मुद्दा निकाली काढावा, अशी मागणी खा. महात्मे यांनी केली. मेंढपाळ निर्यात वाढवणार असल्याचेही ते म्हणाले.

Trending