आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Uri' Actress Kirti Kulhari Said, "Because Republic Day Has Given Us Real Freedom, We Can Protest Today."

'उरी' मधील अभिनेत्री कीर्ती कुल्हारी म्हणाली, प्रजासत्ताक दिनाने आपल्याला खरे स्वातंत्र्य दिले म्हणून तर आज विरोध करू शकतो आहे'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : कीर्ति कुल्हारीने ‘पिंक’, ‘शैतान’, ‘इंदू सरकार’, ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ आणि ‘मिशन मंगल’ यांसारख्या चित्रपटात सपोर्टिंग पण तितक्याच दमदार भूमिकेने आपली ओळख बनवली आहे. ‘उरी’ मध्ये फ्लाइट लेफ्टनंट सीरत कौर ही कीर्तीची सर्वात दमदार भूमिका ठरली. कीर्ती सदभ्या आपला अपकमिंग चित्रपट ‘गर्ल ऑन द ट्रेन, ‘बताशा’ यांच्याव्यतिरिक्त वेबसीरीज ‘फोर मोर शॉर्ट्स प्लीज सीजन 2' यांच्यासह अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. कीर्तीचे वडिल नौसेनेमध्ये होते आणि आणि तिची बहीण सेनेमध्ये डॉक्टर आहे, त्यामुळे देशाशी निगडित मुद्द्यावर ती मुक्तपणे आपले मत मांडते. 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दैनिक भास्करसोबत तिने खास बातचीत केली. त्यातीलच काही भाग...  
देशभक्तीच्या थीमवर बनले चित्रपट निवडण्याचे कारण... 

कीर्ती म्हणाली, ‘मी ‘उरी’ आणि ‘मिशन मंगल’ हे चित्रपट केवळ यासाठी निवडले नव्हते कारण, यामध्ये देशभक्ती दाखवली गेली जाईल, पण एक आर्टिस्ट म्हणून मला हे पात्र प्रभावी वाटले. या दोन्ही चित्रपटांची स्क्रिप्ट देशभक्तीने भरलेली होती, त्यामध्ये अचीव्हमेंट्सच्या कथा होत्या. दोन्हीमध्ये कथा आणि इमोशन्स वेगळे होते, पण संदेश एकच होता की, जे हवे त्यासाठी धैर्याने उभे राहा. सोबतच या चित्रपटांपुर्वी एका सामान्य प्रेक्षकाला सर्जिकल स्ट्राइक आणि मार्स ऑर्बिटर मिशनबद्दल जास्त माहित नव्हते. मी खुश आहे की, या चित्रपटांनी लोकांना याची माहिती देऊन सिनेमाशी जोडण्याचे काम केले. चित्रपट समाजावर खोलवर प्रभाव टाकतात आणि आणि मला आनंद आहे या दोन्ही चित्रपटांनी एक नागरिक म्हणून आम्हाला सर्वांशी जोडण्याचे काम केले. या चित्रपटांच्या कथांमधून हाच मॅसेज मिळतो की, आपण सर्व जेव्हा एकत्र उभे राहून कोणत्याही भेदभावाविना एखादे काम करतो तर देशाला पुढे घेऊन जातो. एकतेमध्येच शक्ती आहे.’

वेबसीरीजची पोहोच जगाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत... 

‘वेबसीरीज सारखा ओटीटी प्लॅटफॉर्म असे माध्यम आहे, जे आपल्याला देश आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यापर्यंत पोहोचवू शकते. आणि मला अशा प्लॅटफॉर्मचा भाग बनायला खूप आवडते. ‘बार्ड ऑफ ब्लड’ आणि ‘फोर मोर शॉर्ट्स प्लीज’ ने मला एक वेगळी ओळख दिली आहे आणि चित्रपटांव्यतिरिक्त जर कोणत्याही माध्यमाने मला प्रेक्षकांना भेटण्याची संधी मिळाली तर मी ही संधी अजिबात सोडणार नाही.’

बातम्या आणखी आहेत...