आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्मिलाचे हे रुप बघून व्हाल तुम्हीही घायाळ, नवरा आदिनाथ कोठारे म्हणाला - 'उफ्फ्...'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे उर्मिला कानिटकर-कोठारे. मुलगी जिजाच्या जन्मापासून उर्मिला मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण अधूनमधून ती जाहिरातींमध्ये झळकतेय. अलीकडेच ती एका अॅड फिल्ममध्ये झळकली होती. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. अलीकडेच उर्मिलाने एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये उर्मिलाने मेकओव्हर केल्याचे दिसत आहे. उर्मिलाने मेकओव्हर नंतरचे तीन फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये उर्मिलाला क्षणभर ओळखणे कठीण होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर तेजस नेरुरकरने उर्मिलाचे हे मनमोहक रुप आपल्या कॅमे-यात कैद केलं आहे. तिचे हे रुप बघून फक्त वॉव हेच शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतील.


फोटो शेअर करुन उर्मिलाने त्यांना खास कॅप्शनदेखील दिले आहे. एका फोटोला कॅप्शन देताना उर्मिलाने लिहिले ‘स्त्रीकडे असलेली सर्वात मोहक संपत्ती म्हणजे आत्मविश्वास.’ उर्मिलाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा मेकओव्हर भावला आहे.

इतकेच नाही उर्मिलाचा नवरा आणि अभिनेता आदिनाथ कोठारेनेही 'उफ्फ्...' अशी कमेंट तिच्या फोटोवर केली आहे. 

मराठी इंडस्ट्रीतील उर्मिलाच्या मैत्रिणी क्रांती रेडकर, गिरिजा ओक-गोडबोले आणि कोरिओग्राफर फुलवा खामकर यांनीही उर्मिलाच्या फोटोला दाद दिली आहे.  गिरीजाने 'हॉट',फुलवा खामकरने 'वॉव' तर क्रांती रेडकर 'सुपर बेबी' अशी कमेंट उर्मिलाच्या फोटोवर केली आहे.  

उर्मिला सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असून तिच्या कुटुंबावर ती लक्ष केंद्रीत आहे. मुलगी जिजासोबतचे फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. दुनियादारी, काकण, मला आई व्हायचंय यासह अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवणा-या उर्मिलाला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी नक्कीच तिचे चाहते आतुर असतील.   

बातम्या आणखी आहेत...