Home | News | Urmila Matondkar comments on pm Narendra Modi Balakot radar statement

पीएम मोदींच्या रडारच्या विधानावर उर्मिला मातोंडकरने केली टिप्पणी, म्हणाली - 'माझ्या कुत्र्याला देखील रडारचे सिग्नल मिळत आहेत.'

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 14, 2019, 02:49 PM IST

ढगाळ वातावरणामुळे विमानं रडारवर दिसणार नसल्याचे मोदींने केले होते विधान

  • Urmila Matondkar comments  on pm Narendra Modi Balakot radar statement


    मुंबई - अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींनी मुलाखतीत सांगितलेल्या एका किस्स्यावर उर्मिलाने टीका केलीये. सध्या मोदींच्या मुलाखतीचा काही भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये मोदींनी ढगाळ वातावरण असले तरी एअर स्ट्राइक करणे चांगले राहील. कारण अशा वातावरणामुळे आपले विमानं रडावर दिसणार नाही.

    मोदींच्या या व्यक्तव्याबाबत टीका करताना उर्मिलाने आपल्या कुत्रासोबत साफ वातावरणाचा एक फोटो शेअर केला. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी देवाचे आभार मानते की, सध्या आकाश साफ आहे आणि ढगाळ वातारवण नाही. यामुळे माझा कुत्रा रोमियोच्या कानापर्यंत रडारचे सिग्नल सहजरित्या पोहचत आहेत.' यानंतर उर्मिलाने एक विनोदी इमोटिकॉन देखील बनवले.

    पीएम मोदींचा हा व्हिडिओला भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटरवर शेअर केले होते. पण नंतर तो व्हिडिओ काढून टाकण्यात आला. पक्षाने जरी व्हिडिओ हटवला असला तर याचे स्क्रीनशॉट शेअर करण्यात येत आहेत.

Trending