आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने हाती घेतला काँग्रेसचा \'हात\'; म्हणाली, काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने काँग्रेसचा 'हात' हाती घेतला आहे. बुधवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिलाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उर्मिलाला उत्तर मुंबईतून लोकसभेची उमेदवारी मिळण्‍याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

लहानपणापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांनी मला प्रभावित केले आहे. शिवाय काँग्रेसच्या विचारधारेवर माझा विश्वास असल्याचे उर्मिला हिने सांगितले.

 

भाजपने उत्तर मुंबईतून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे. शिवाय शेट्टी यांची या परिसरात चांगले वजन असल्यामुळे त्यांच्यासमोर टिकाव लागण्यासाठी काँग्रेसला तगड्या उमेदवार हवा होता. दरम्यान, उत्तर- मुंबई मतदार संघात काँग्रेसकडून अभिनेत्री आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरु होती. अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर भुरळ पाडणारी उर्मिला मतदारांच्या मनात जागा निर्माण करण्यात यशस्वी होते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

बातम्या आणखी आहेत...