आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्मिला मातोंडकरची EVM विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, EVM नंबर आणि सहीमध्ये तफावत असल्याचा आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. देशभरासह राज्यातही भाजप पक्ष आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने ईव्हीएम बाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मागाठाणे येथील EVM नंबर आणि सहीमध्ये तफावत असल्याचे उर्मिलाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. उर्मिलाने याबाबतचे ट्वीट देखील केले आहे. 

 

 

गोपाळ शेट्टींची आघाडी
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपकडून गोपाळ शेट्टी तर काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर हे रिंगणात होते. विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी उर्मिलाला आव्हान दिले होते. यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पण, सध्याचा कल पाहता भाजपचे गोपाळ शेट्टी आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. 2014 गोपाळ शेट्टी मताधिक्क्याने निवडून आले होते. 

बातम्या आणखी आहेत...