आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला काँग्रेसने घातली गळ, या तीन जागांचा घोळ संपता संपेना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी या भाजपच्या विद्ममान खासदाराच्या विरोधात काँग्रेस अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला उमेदवारी देण्याची शक्यता असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. तसेच उत्तर पश्चिम मुंबईतून मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे.

 

काँग्रेसच्या वाट्यास राज्यातले 26 मतदारसंघ आले आहेत. काँग्रेसने त्यातील पालघरची हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला तर सांगलीची जागा राजु शेट्टी यांच्या स्वाभीमानी पक्षाला सोडली आहे. उर्वरित 24 मतदारसंघ काँग्रेस लढवत आहे.

 

त्यातील 21 जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पुणे, उत्तर मुंबई आणि उत्तर-पश्चिम मुंबई अशा तीन मतदारसंघातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यात काँग्रेसला अद्याप यश आलेले नाही. मागच्या वेळी उत्तर मुंबईत संजय निरुपम पराभूत झाले होते. यावेळी निरुपम हे उत्तर पश्चिम मुंबईतून इच्छुक आहेत. उत्तर पश्चिम मधून 2014 मध्ये गुरुदास कामत लढले होते. मध्यंतरी कामत यांचे निधन झाल्याने येथे काँग्रेसला उमेदवार नाही.

 

त्यामुळे उत्तर मुंबईत कोण, असा काँग्रेसपुढे मोठा प्रश्न आहे.अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्याशी काँग्रेसने संपर्क केला असून उर्मिलाचे नाव जवळजळ निश्चित झाल्याचे काँग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे आहे.

 

सचिनकडे विचारणा
उत्तर मुंबई हा भाजपचे बुजुर्ग नेते राम नाईक यांचा मतदारसंघ. 2009 मध्ये अभिनेता गोविंदाला उमेदवारी देऊन काँग्रेसने नाईकांना घरी बसवले. त्यानंतर भाजपचे गोपाळ शेट्टी 2014 मध्ये येथून निवडून आले. शेट्टी हे तगडे उमेदवार आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी यावेळी काँग्रेस वलयांकीत उमेदवारांच्या शोधात आहे. त्यातून काँग्रेसने क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला गळ घातली होती. पण, सचिनने नम्र नकार दिला. त्यामुळे उर्मिलाचे नाव सध्या पुढे आले आहे.

बातम्या आणखी आहेत...