आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 वर्षे लहान अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा होता फिल्ममेकर, प्रत्येक चित्रपटात तिलाच करायचा कास्ट, अॅक्ट्रेसला सत्य कळाले तर तिने उचलले मोठे पाऊल 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. बॉलिवूडची 'छम्मा-छम्मा' गर्ल उर्मिला मातोंडकर 45 वर्षांची झाली आहे. 4 फेब्रुवारी, 1974 मध्ये मुंबईत तिचा जन्म झाला. तिने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली होती. 'नरसिम्हा' हा उर्मिलाचा पहिला चित्रपट होता, पण तिला खरी ओळख 'रंगीला' चित्रपटातून मिळाली. 1995 मध्ये 'रंगीला' चित्रपटात काम करत असताना रामगोबाल वर्मा उर्मिलाच्या प्रेमात पडला. एका काळात तर बॉलिवूडमध्ये रामगोपाल वर्मा आणि उर्मिलाच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत राहिल्या. त्या काळात रामगोपाल वर्मा त्याच्या चित्रपटात फक्त उर्मिलाच घ्यायचे असे बोलले जाते. 

 

रामगोपाल वर्माने उर्मिलाला बॉलिवूडसोबतच साउथ चित्रपटांमध्येही कास्ट केले 
'रंगीला'पुर्वी रामगोपाल वर्माने उर्मिलासोबत 1992 मध्ये आलेल्या 'अंथम', द्रोही आणि 1993 मध्ये रिलीज झालेल्या 'गायम' या तेलुगु चित्रपटात संधी दिली होती. एक काळ असा होता की, रामगोपाल वर्मा आपल्या चित्रपटांमध्ये उर्मिलालाच कास्ट करायचा. 

 

रामगोपालने आपल्या ऑफिसच्या खोलीचे नावही 'उर्मिला मातोंडकर' ठेवले 
रामगोपाल वर्मा उर्मिलाच्या एवढ्या प्रेमात होता की, त्यानी आपल्या अंधेरी, मुंबई येथील ऑफिसच्या एका खोलीचे नावही 'उर्मिला मातेंडकर' ठेवले आहे. रामगोपालच्या ऑफिसच्या ग्राउंड फ्लोरवर 15 खोल्या आहेत. यांचा वापर एडिटिंग, पोस्ट प्रोडक्शन, साउंड डिपार्टमेंटसाठी वापरल्या जातात. 

 

रामगोपालमुळे बिघडले उर्मिलाचे करिअर 
फक्त रामगोपाल वर्माच्या चित्रपटात काम करत असल्यामुळे उर्मिलाने दूस-या अनेक डायरेक्टर्ससोबत काम करण्यास नकार दिला होता. तर रामगोबाल वर्मासोबत बॉलिवूडच्या अनेकांचे पटत नव्हते. यामुळे अनेक डायरेक्टरर्सने उर्मिलाला घेणे बंद केले. हळुहळू उर्मिलाला चित्रपट मिळणे बंद झाले आणि तिच्या करिअरला उतरतीकळा लागली. 

 

उर्मिलासाठी माधुरीलाही चित्रपटातून काढले 
रिपोर्ट्सनुसार, एकदा उर्मिलासाठी रामगोबाल वर्माने माधुरी दीक्षितला चित्रपटातून काढून टाकले होते. नंतर रहस्य उलगडले की, रामगोपाल वर्मा उर्मिलावर जिवापाड प्रेम करत होता. यामुळे ते उर्मिलाला चित्रपटासाठी साइन करायचे. ज्यावेळी उर्मिलाला ही गोष्ट कळाली तेव्हा तिने रामगोपाल वर्माचे प्रपोजल नाकारले होते. तसेच उर्मिलाने रामगोपाल वर्मासोबत चित्रपटांमध्ये काम करणेही बंद केले होते. 

 

9 वर्षे लहान कश्मीरी बिझनेसमनसोबत थाटले लग्न 
उर्मिला मातोंडकरने 3 मार्च, 2016 ला स्वतःपेक्षा 9 वर्षे लहान कश्मीरी बिझनेसमन मोहसिन अख्तर मीरसोबत लग्न केले. मोहसिन जोया अख्तरच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेल्या 'लक बाय चान्स' चित्रपटात दिसला होता. यामध्ये तो फरहान अख्तरसोबत मॉडलिंग करताना दिसला होता. मोहसिन, काश्मीरच्या बिझनेसमन कुटूंबातून आहे. पण नेहमी मॉडल बनण्याचे स्वप्न पाहायचा. सौरभ सेनगुप्ताच्या 'इट्स मॅन्स वर्ल्ड' मध्येही त्याने प्रमुख भूमिका साकारली आहे. मोहसिनने 'चकदे इंडिया' आणि 'बीए' पास सारख्या चित्रपटात काम करणा-या शिल्पा शुक्लासोबत कॉमेडी फिल्म 'मुंबई मस्त कलंदर'मध्येही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर उर्मिला दिर्घकाळापासून चित्रपटांपासून दूर आहे. ती शेवटच्यवेळी 2018 मध्ये आलेल्या 'ब्लॅकमेल'मध्ये 'बेवफा ब्यूटी' या आयटम नंबरमध्ये दिसली होती. 

 

रामगोपालसोबत उर्मिलाने केले 13 चित्रपटांमध्ये काम 
उर्मिलाने रामगोपाल वर्मासोबत एकूण 13 चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये अंथम, द्रोही, गायम, अंगनगा ओका राजू(सर्व तेलुगु), रंगीला, दौड, सत्या, कौन, मस्त, जंगल, कंपनी, भूत आणि आग सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. 

बातम्या आणखी आहेत...