आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय पडघम : ऊर्मिला, कृपांचा काँग्रेसला रामराम; 'वंचित'ला ओवेसींकडूनही तलाक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ औरंगाबाद : लाेकसभा निवडणुकीच्या ताेंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेली बाॅलीवूड अभिनेत्री ऊर्मिला माताेंडकरने अंतर्गत राजकारणाला कंटाळून पाच महिन्यांतच पक्षाला साेडचिठ्ठी दिली. 'लोकसभा निवडणुकीत झालेल्या पक्षातील गैरप्रकाराबाबत वरिष्ठ नेत्यांना १६ मे रोजी एक पत्र लिहिले होते. माझ्या पत्राच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई केली नाही. तेव्हा मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मिलिंद देवरा होते. उलट गोपनीय असलेले हे पत्र माध्यमांना सोयीस्करपणे पुरवले गेले. माझ्या म्हणण्यानुसार हा निंदनीय विश्वासघात आहे,' अशी टीका करत ऊर्मिलाने मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला. दरम्यान, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनीही काँग्रेसला रामराम ठाेकला. ते भाजपत जाणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृपाशंकर यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले हाेते. तेव्हापासूनच त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली हाेती.


एमआयएमने जाहीर केले तीन उमेदवार
'वंचित'शी आघाडी ताेडण्याचा इम्तियाज जलील यांचा निर्णय अधिकृत : ओव
ेसी
विधानसभा निवडणुकीसाठी सन्मानजनक जागा मिळत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीशी युती ताेडण्याचा निर्णय दाेन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केला हाेता. मात्र आमची बाेलणी पक्षाध्यक्ष ओवेसी यांच्याशी असून राज्यातील नेत्यांशी आमची युती नसल्याचे सांगत इम्तियाज यांच्या बाेलण्याला महत्त्व देत नसल्याचे दर्शवले हाेते. एमआयएमशी सकारात्मक चर्चा करू, असेही अॅड. आंबेडकर यांनी सांगितले हाेते. मात्र इम्तियाज यांनी जाहीर केलेला निर्णय हीच पक्षाची भूमिका असल्याचे ओवेसींनी जाहीर केले. त्यामुळे आंबेडकर ताेंडघशी पडले. दरम्यान, खासदार इम्तियाज यांनी मंगळवारी पत्रक काढून एमआयएमचे राज्यातील ३ उमेदवार जाहीर केले. वडगाव शेरी (पुणे) : डॅनिएल रमेश लांडगे, मालेगाव मध्य : मुफ्ती माेहंमद इस्माईल अब्दुल खलिक, नांदेड दक्षिण : माेहंमद फेराेज खान (लाला) अशी त्यांची नावे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक, काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, साताऱ्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील हे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करणार आहेत. गणेश नाईक यांचे पुत्र आमदार संदीप नाईक यांनी यापूर्वीच भाजपत प्रवेश केला आहे. इंदापूर मतदारसंघ काँग्रेसला साेडण्यास राष्ट्रवादी तयार हाेत नाही व त्यासाठी पक्षातूनही पाठपुरावा केला जात नसल्याने हर्षवर्धन यांनी काँग्रेस साेडण्याचा निर्णय जाहीर केला हाेता. त्यांचे मन वळवण्यासाठी दाेन्ही पक्षांतील नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र हर्षवर्धन निर्णयावर ठाम राहिले.

भाजपची मेगाभरती : गणेश नाईक, हर्षवर्धन पाटील आज करणार प्रवेश
साेनिया-पवारांची चर्चा
नवी दिल्ली : आघाडीतील जागावाटपावर अंतिम चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्षा साेनिया गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. लवकरच आघाडीचे जागावाटप जाहीर हाेणार असल्याचे संकेत या चर्चेनंतर मिळाले.