आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - भाजप देशभरात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलशांची यात्रा काढणार आहे. त्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहांनी बुधवारी सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना अस्थीकलश सुपूर्द केले. हे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या राज्यात हे कलश नेणार आहेत. त्याठिकाणी अस्थीकलशाची यात्रा काढली जाणार आहे. तसेच श्रद्धांजली सभाही घेतली जाईल. यावेळी अटलजींची मानसकन्या नमिता कौल भट्टाचार्यही उपस्थित होत्या.
यापूर्वी अटलजींच्या अस्थी 19 ऑगस्टला हरिद्वारमध्ये विसर्जित करण्यात आल्या होत्या. नमिता यांच्या हस्ते अस्थी विसर्जन करण्यात आले होते. यावेळी अटलजींची नात निहारिका, अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थिती होते. अटलजींनी 16 ऑगस्टला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता.
100 नद्यांमध्ये करणार विसर्जन
भाजपचे प्रवक्ते भूपेंद्र यादव यांनी सांगितले होते की, अटलजींच्या अस्थी देशातील 100 नद्यांमध्ये विसर्जित केल्या जातील. त्याशिवाय 20 दिवस देशांच्या सर्व राज्यांमध्ये प्रार्थना सभा आयोजित केल्या जातील. दिल्लीमध्ये 20 ऑगस्टला इंदिरा गांधी स्टेडियममध्ये श्रद्धांजली सबेचे आयोजन करण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.